मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, हा मोठा पक्ष आघाडीतून बाहेर पडणार?

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, इंडिया आघाडीत मोठी फूट पडण्याची शक्यता असून, मोठा पक्ष इंडिया आघाडीची साथ सोडण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीपूर्वीच घडामोडींना वेग आला आहे.

मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, हा मोठा पक्ष आघाडीतून बाहेर पडणार?
India Aghadi
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 8:33 PM

महिनाभरापूर्वीच तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली, या निवडणुकीत थलपती विजय यांना मोठं यश मिळालं होतं. थलपती विजय यांच्या टीव्हीकेला तामिळनाडूमध्ये सर्वाधिक 108 जागा मिळाल्या, मात्र तरी देखील ते बहुमतापासून दूर होते. त्यानंतर काँग्रेसने डीएमकेची साथ सोडत तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दिला. हा डीएमकेसाठी मोठा धक्का होता. थलपती विजय यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यानंतर इतर काही पक्षांचा पाठिंबा मिळून तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापन केली थलपती विजय हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणते इंडिया आघाडीमध्ये फूट पडल्याचं समोर आलं आहे. काँग्रेसने तामिळूनाडूमध्ये थलपती विजय यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेनंतर आता डीएमकेनं इंडिया आघाडीला मोठा धक्का दिला आहे. आठ जूनला दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे, या बैठकीत सहभागी न होण्याचा निर्णय डीएमकेनं घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. आमच्यासोबत तामिळनाडूमध्ये काँग्रेसने मोठा विश्वासघात केला आहे. त्यामुळे अजूनही कार्यकर्ते नाराज असल्याचं डीएमकेनं म्हटलं आहे.

डीएमकेची नेमकी भूमिका काय?

आठ जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं डीएमकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. काँग्रेसने तामिळनाडूमध्ये थलपती विजय यांना पाठिंबा दिल्यामुळे आमचा मोठा विश्वासघात झाला आहे. कार्यकर्ते नाराज आहेत, त्यामुळे आम्ही या बैठकीमध्ये सहभागी होणार नसल्याचं डीएमकेनं म्हटलं आहे. या बैठकीमध्ये काँग्रेस देखील सहभागी होणार असल्यानं आम्ही या बैठकीला उपस्थित राहाणार नसल्याचं डीएमकेनं स्पष्ट केलं आहे. आम्ही जरी या बैठकीमध्ये सहभागी होणार नसलो तरी देखील देश हिताच्या प्रश्नांवर आम्ही आवाज उठवत राहू असं देखील डीएमकेनं स्पष्ट केलं आहे.

ममता बॅनर्जी देखील सहभागी होणार

दरम्यान आठ जून रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये ममता बॅनर्जी देखील सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाला. फक्त पक्षाचाच नाही तर ममता बॅनर्जी यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला. पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता आली. दरम्यान त्यानंतर ममता बॅनर्जी यांना बुधवारी आणखी एक मोठा धक्का बसला तो म्हणजे तब्बल 58 आमदार पक्षातून बाहेर पडले आहेत. तृणमूल काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे, या सर्व घडामोडींनंतर आता ममता बॅनर्जी या देखील इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.

Follow Us