मोठी बातमी! इराणमध्ये मोठी फूट, थेट मोजतबा खामेनेई…, ट्रम्प यांना जसं पाहिजे होतं तसंच घडलं

अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविराम वाढवण्यात आला असला तरी देखील दोन्ही देशांमध्ये संघर्ष वाढतच असल्याचं पहायला मिळत आहे, मात्र याचदरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराणमध्ये आता फूट पडली आहे.

मोठी बातमी! इराणमध्ये मोठी फूट, थेट मोजतबा खामेनेई..., ट्रम्प यांना जसं पाहिजे होतं तसंच घडलं
Khamenei, Trump
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 25, 2026 | 6:46 PM

अमेरिका आणि इराणमध्ये तब्बल 39 दिवस युद्ध सुरू होतं. 1 मार्च रोजी म्हणजेच युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर भीषण असा हल्ला करण्यात आला, या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण इराण एकत्र झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर इराणने अमेरिका आणि इस्त्रायलविरोधात जो लढा उभारला त्यामुळे या दोन्ही बलाढ्य देशांना मोठा हादरा बसला. अमेरिका आणि इस्त्रायलने केलेल्या हल्ल्यांमध्ये इराणंच प्रचंड प्रमाणात नुकसान झालं, मोठी जीवित आणि वित्तहानी झाली. मात्र तरी देखील इराणने माघार घेतली नाही. इराणने केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिका आणि इस्त्रायलमध्ये हाहाकार उडाला. शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: युद्धविरामासाठी पुढाकार घेतला. अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवड्यांचा युद्धविराम झाला होता. दरम्यान हा युद्धविराम संपल्यानंतर पुन्हा एकदा ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवण्याची घोषणा केली.

मात्र आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इराणमध्ये आता मोठी फूट पडल्याचं दिसून येत आहे. इराणमधील नेत्यांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चेची दुसरी फेरी होणार आहे. त्यापूर्वीच इराणच्या काही प्रमुख नेत्यांनी इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांना एक पत्र लिहिलं आहे. हे पत्र समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या पत्रामध्ये या नेत्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की, इराणची अवस्था आर्थिक आघाडीवर खूप गंभीर बनली आहे, त्यामुळे आता आपण अमेरिकेसोबत आता गांभीर्याने अणू ऊर्जेवर चर्चा केली पाहिजे, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

दरम्यान जरी इराणच्या अधिकाऱ्यांनी खामेनेई यांना पत्र लिहंलं असलं तरी देखील खामेनेई यांनी मात्र या चर्चेला नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे इराणमध्ये मोठी फूट पडल्याचं आता दिसून येत आहे. दरम्यान अमेरिकेमध्ये फूट पडावी यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देखील अनेकदा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून आलं, युद्ध सुरू होण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांना भडकावलं होतं. आंदोलन करा, आमची सेना तुमचं संरक्षण करण्यासाठी येत आहे, असं आश्वासन ट्रम्प यांनी इराणमधील आंदोलकांना त्यावेळी दिलं होतं.

 

Follow Us