‘माझी सवत…’; सुहागरात्रीच्या दिवशी पतीला 35 तुकडे करण्याची धमकी देणाऱ्या सितारा प्रकरणात मोठं ट्विस्ट

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पत्नी सुहागरात्रीच्या दिवशीच पळून गेल्याची एक घटना घडली होती, तीने आपल्या पतीला मारण्याची धमकी देखील दिली होती, या प्रकरणात आता मोठं ट्विस्ट आलं आहे.

माझी सवत...; सुहागरात्रीच्या दिवशी पतीला 35 तुकडे करण्याची धमकी देणाऱ्या सितारा प्रकरणात मोठं ट्विस्ट
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 25, 2025 | 4:41 PM

उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये पत्नी सुहागरात्रीच्या दिवशीच पळून गेल्याची एक घटना घडली होती, याबाबत तिच्या पतीनं खुलासा करताना असं म्हटलं होतं की, तीचा एक प्रियकर आहे, आणि तिने सुहागरात्रीच्या दिवशीच आपल्याला धमकी दिली होती की, जर माझ्या अंगाला जरी हात लावला तर तुझे 35 तुकडे होतील. माझ्यावर तुझा नाही तर दुसरा कोणाचा तरी हक्क आहे. त्यानंतर त्याची पत्नी त्याच रात्री पळून गेली. त्यानंतर आता जी महिला आपल्या बॉयफ्रेन्डसोबत पळून गेल्याचा दावा केला जात होता, ती महिला समोर आली आहे. तीने जे सांगितलं त्यानंतर आता या प्रकरणात मोठं ट्विस्ट निर्माण झालं आहे. मी माझ्या प्रियकरासोबत पळून गेली नव्हते तर माहेरी गेली हेते, कारण माझं ज्यासोबत लग्न झालं त्याची आधीच एक पत्नी आणि एक मुलगी आहे, असा दावा या महिलेनं केला आहे.

या घटनेबाबत एका वृत्तपत्राला माहिती देताना या महिलेनं असं म्हटलं की, माझा पती कप्तान निषाद याने माझ्यावर जे आरोप केले आहेत, ते सर्व खोटे आहेत. मी लग्नानंतर 30 एप्रिलला माझ्या सासरी पोहोचले, त्यानंतर रात्री मी जेव्हा बेडरूममध्ये होते, तेव्हा माझा पती दारूच्या नशेत बेडरूममध्ये आला, तेव्हाच मला त्याच्या अफेअरबाबत माहित झालं, त्यानंतर त्याने मला एक फोटो दाखवला आणि म्हणाला ही माझी बायको आहे, आणि मला एक सात वर्षांची मुलगी देखील आहे. मी तुझ्यासोबत राहू शकत नाही.

तेव्हा मी पण त्याला म्हणाले की मी देखील एका मुलासोबत बोलते, हे एकताच त्याने मला मारायला सुरुवात केली. त्याने मला रात्रभर एका कोपऱ्यात बसून ठेवलं, मला पानी देखील दिलं नाही, बाथरूममधील पाणी प्यायला लावलं, जेव्हा माझा नाइलाज झाला तेव्हा तीन दिवसांनी मी माझ्या मावशीकडे पळून गेले, मी तिथे 12 दिवस लपून राहिले, तेव्हा मला याची कल्पना देखील नव्हती की माझा पतीने माझी बदनामी सुरू केली आहे, असा दावा या घटनेतील मुलगी सितारा हिने केला आहे.

दरम्यान लग्नापूर्वी माझे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते, मात्र लग्नानंतर मी त्याच्याशी असलेले सर्व संबंध तोडले होते, आम्ही बोलत देखील नव्हतो, मला माझ्या पतीने बदनाम केलं आहे, मी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे.