AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, आता नवाज शरीफ यांच्या हाती सत्ता? पुन्हा होणार पंतप्रधान

पाकिस्तान सध्या हिंसाचाराच्या आगेत होरपळून निघत आहे. बलुचिस्तान हातातून निसटण्याची शक्यता आहे. बलूच बंडखोरांनी पाकिस्तान सरकारच्या नाकात दम केला आहे, या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

पाकिस्तानमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, आता नवाज शरीफ यांच्या हाती सत्ता? पुन्हा होणार पंतप्रधान
Nawaz SharifImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 03, 2026 | 9:04 PM
Share

पाकिस्तान सध्या हिंसेच्या आगीत होरपळून निघत आहे. रविवारी पाकिस्तानमध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे पाक व्याप्त काश्मीरमध्ये देखील गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरूच आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. काही दिवसांपूर्वी असीम मुनीर यांच्या आदेशावरून पाकिस्तानच्या सैनिकांनी पाक व्याप्त काश्मीरमधील आंदोलकांवर गोळीबार केला होता, या गोळीबारात अनेक आंदोलक मृत्युमुखी पडले होते. तर दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये देखील अशीच स्थिती आहे. बलूच बंडखोरांनी पाकिस्तान सरकारच्या नाकात दम केला आहे. स्वातंत्र्य बलूचिस्तानची मागणी होत आहे. बलूच बंडखोरांकडून पाकिस्तानच्या सैन्यांवर हल्ले सुरू आहेत, या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानात प्रचंड अस्थिरता आहे. त्यातच महागाई वाढल्यामुळे नागरिकांमध्ये सरकारविरोधात असंतोष आहे. पाकिस्तानमध्ये हे सर्व घडत असतानाच आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे नवाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पाक व्याप्त काश्मीरमध्ये झालेल्या निवडणुकीत शहबाज शरीफ यांचा पक्ष असलेल्या मुस्लिम लीग नवाजला मोठा विजय मिळाला आहे, त्यामुळे त्यांनी आता पीओकेमध्ये सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. पाकव्याप्त काश्मीरला वेगळा पंतप्रधान आणि पाकिस्तानला वेगळा पंतप्रधान अशी व्यवस्था पाकिस्तानमध्ये आहे. पीओकेसाठी स्वतंत्र पंतप्रधान तसेच सरकारची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु सुरक्षा आणि इतर महत्त्वाच्या खात्यांवर अप्रत्यक्षपणे पाकिस्तानी सरकारचंच नियंत्रण असतं, दरम्यान पीओकेमध्ये शहबाज शरीफ यांचा पक्ष विजयी झाल्यामुळे आता त्यांचे बंधू नवाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान पीओकेमध्ये होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीला भारताकडून कोणतीही अधिकृत मान्यता नाहीये.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी मुजफ्फरबादमध्ये बोलताना आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली होती. जर पाकिस्तानमध्ये आपल्या पक्षाचं सरकार आलं तर मी शहाबाज शरीफ यांना सांगेल की मला पीओकेचा पंतप्रधान करा असं त्यांनी एका रॅलीला संबोंधित करताना म्हटलं होतं. यावेळी त्यांची मुलगी आणि पाकिस्तानमधील पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज यांची देखील उपस्थिती होती. त्यामुळे आता नवाज शरीफ हे पंतप्रधान होणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं