भारत पुढच्या आठवड्यात करणार सर्वात मोठा धमका, थेट अमेरिकेत जाणवणार हादरे, डोनाल्ड ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका

आंतरराष्ट्रीय बाजारातून भारतासाठी मोठी गुड न्यूज समोर आली आहे. हा अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात असून, पुढील आठवड्यात भारत मोठा धमका करण्याची शक्यता आहे. ज्याचे हादरे अमेरिकेत जाणवणार आहेत.

भारत पुढच्या आठवड्यात करणार सर्वात मोठा धमका, थेट अमेरिकेत जाणवणार हादरे, डोनाल्ड ट्रम्प यांना 440 व्होल्टचा झटका
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 23, 2026 | 11:22 PM

अमेरिकेनं भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे, त्याचा मोठा फटका सध्या देशाला बसत आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मात्र अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर आता भारतानं आपला मोर्चा हा चीन आणि रशियाकडे वळवला आहे, अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफनंतर भारताची रशिया आणि चीनसोबत जवळीक वाढली असून, निर्यातीच्या प्रमाणामध्ये देखील लक्षणीय वाढ झाली आहे. आता एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी व्यापारी डील होणार आहे, मात्र अमेरिकेच्या काही चुकीच्या धोरणांमुळे ही डील लांबणीवर पडली आहेत, एकीकडे अमेरिकेसोबत डीलची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे भारतानं आपल्या प्लॅन बीवर देखील काम सुरू ठेवलं होतं. प्लॅन बीमध्ये भारताला मोठं यश मिळालं असून, पुढच्या आठवड्यात भारत जगभरात मोठा धमका करणार असून, या धमक्याचे हादरे थेट अमेरिका आणि चीनपर्यंत पोहोचणार आहेत.

भारतासाठी जागतिक बाजारातून एक गुडन्यूज समोर आली आहे. ती म्हणजे भारत आणि EU युरोपिय संघामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली मुक्त व्यापार कराराची (Free Trade Agreement) चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कराराची घोषणा आता लवकरच म्हणजे 27 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या भारत युरोपियन संघांच्या शिखर परिषदेमध्ये होऊ शकते. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयेन यांनी भारत आणि युरोपियन संघामध्ये होणाऱ्या या कराराला मदर ऑफ ऑल डील्स असं म्हटलं आहे. हा एक असा सामंजस्य करार आहे, जो की अस्तित्वात आल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेच्या एकूण जीडीपीच्या 25 टक्के भागाशी थेट जोडला जाणार आहे.हा करार विविध प्रकारचं सामान, वस्तू आणि सेवा या घटकांशी संबंधित असणार आहे. यातून भारताला मोठा फयदा होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून युरोपियन संघ आणि भारतामध्ये या कराराबाबत बोलणी सुरू होती, अखेर आता ही चर्चा अतिंम टप्प्यात पोहोचली असून, पुढील आठवड्यात याबाबत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. एकीकडे अमेरिकेसोबत ट्रेड डीलची बोलणी सुरू असतानाच भारत आता युरोपियन संघासोबत व्यापारी करार करणार आहे, हा भारतानं अमेरिकेसाठी दिलेला मोठा धक्का मानला जात आहे.