सत्ता दिल्यास मोफत लस देऊ; बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचं आश्वासन

'एनडीए'च्या 15 वर्षांच्या कार्यकाळात बिहारचा जीडीपी 3 टक्क्यांवरून 11.3 टक्क्यांवर गेला. | Bihar Election 2020

सत्ता दिल्यास मोफत लस देऊ; बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपचं आश्वासन

पाटणा: राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सरकारच्या काळात बिहारच्या जीडीपीमध्ये लक्षणीय वाढ झाली, असे सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भाजपची पाठ थोपटली. ‘एनडीए’च्या 15 वर्षांच्या कार्यकाळात बिहारचा जीडीपी 3 टक्क्यांवरून 11.3 टक्क्यांवर गेला. बिहारमध्ये जंगलराज असते तर हे शक्य झाले नसते. एनडीए सरकारने सुशासनाला प्राधान्य दिल्यामुळेच बिहारचा हा विकास शक्य झाला, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोनावर लस सापडत नाही तोपर्यंत मास्क वापरणे गरजेचे आहे. ही लस उपलब्ध झाल्यावर तिचे मोठ्याप्रमाणावर उत्पादन केले जाईल. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देण्यात येईल. हे आमच्या जाहीरनाम्यातील प्रमुख वचन असल्याचे त्यांनी म्हटले.


भाजपच्या या जाहीरनाम्यात 19 लाख रोजगारांची निर्मिती, क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापन अशा घोषणांचा उल्लेख आहे. लोकांनी आपले मत देऊन एनडीए सरकारला विजयी करावे. पुढील पाच वर्षांसाठी नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या नेतृत्त्वाखाली बिहार एक प्रगत आणि विकसित राज्य म्हणून नावारुपाला येईल, असा विश्वासही निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला.


बिहारमध्ये 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7  नोव्हेंबर अशी तीन टप्प्यांत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यानंतर 10 नोव्हेंबरला या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

संबंधित बातम्या:

बिहारमध्ये ‘JDU’ आणि ‘RJD’त 77 जागांवर थेट टक्कर, भाजपला फायदा होणार?

बिहारमध्ये भाजपच्या जागा वाढल्यास कोण होणार मुख्यमंत्री? अमित शाहांनी केलं स्पष्ट

नितीश कुमारांच्या डोकेदुखीत वाढ; तिकीट कापलेले भाजप नेते पासवानांच्या पक्षात

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *