वा! 25 लाख मिठाया, 50 लाख रसगुल्ले… देशातील महागडं लग्न, गावागावातून बघ्यांची गर्दी

बिहारचे बाहुबली आमदार अनंत सिंह यांच्या मुलीचा शाही विवाह अवघ्या पाच दिवसांवर आहे. या अविस्मरणीय लग्नासाठी नदवां गावात जय्यत तयारी सुरू आहे. 25 लाख मिठाया, 50 लाख रसगुल्ले आणि 150 पदार्थांसह 10 लाख पाहुण्यांची व्यवस्था केली जात आहे. 1500 क्विंटल साखर वापरली जात असून संपूर्ण गावाला नवरीसारखे सजवले आहे. हे महागडे लग्न पाहण्यासाठी बिहारमधून लोक येत आहेत.

वा! 25 लाख मिठाया, 50 लाख रसगुल्ले... देशातील महागडं लग्न, गावागावातून बघ्यांची गर्दी
anant singh
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 20, 2026 | 3:39 PM

बिहारचे बाहुबली नेते आणि मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवानी हिचं लग्न अवघ्या पाच दिवसावर येऊन ठेपलं आहे. हे लग्न अविस्मरणीय करण्यासाठी अनंत सिंह यांनी कोणतीच कसर सोडलेली नाही. नदवां गावात लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. वऱ्हाडी मंडळीच्या स्वागतासाठी खास सजावट करण्यात येत आहे. भव्यदिव्य मंडप उभारण्यात येत आहेत. लग्नात आलेल्या पाहुण्यांसाठी 150 प्रकारचे देशी विदेशी पदार्थ असणार आहेत. यात 25 लाखाहून अधिक मिठाया, 50 लाख रसगुल्ल्यांचा समावेश आहे. गोड पदार्थ बनवण्यासाठी पाच ट्रक साखर आणण्यात आली आहे. लग्नाला सुमारे 10 लाख लोक येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या शाही विवाहामुळे नदवां गावातील हवाच बदलून गेली आहे. संपूर्ण गावाला नव्या नवरी सारखं नटवलं आहे. गावात प्रचंड स्वच्छता ठेवण्यात येत आहे. गावाच्या दीड किलोमीटरपर्यंत स्वागत गेट उभारण्यात आले आहेत. याच गेटमधून पाहुण्यांचं खास स्वागत केलं जाणार आहे. नदवां गावातील ही तयारी पाहण्यासाठी अख्ख्या बिहारमधून लोक येत आहेत. त्यामुळे नदवां गावात सध्या प्रचंड वर्दळ वाढली आहे. परिणामी, स्थानिक दुकानदारांचा धंदाही तेजीत आला आहे.

Loading...

1500 क्विंटल साखर

शिवांगीच्या लग्नासाठी मिठायांची खास व्यवस्था करण्यात आली आहे. पाहुण्यासाठी 25 लाखाहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया करण्यात येणार आहेत. त्यासाठी सुमारे 1500 क्विंटल साखर मागवण्यात आली आहे. पाच ट्रक भरून ही साखर आणण्यात आली आहे. प्रत्येक ट्रकमध्ये प्रत्येकी 300 क्विंटल साखर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मिठाई तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हलवाई आणि कारागिर कामाला लावले आहेत. लग्नात आलेल्या पाहुण्यांना कोणत्याच प्रकारची कमी जाणवू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

20 टीम तैनात

स्वयंपाक बनवण्यासाठी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे 10 एकरवर व्यवस्था करण्यात आली आहे. तब्बल 10 लाख लोकांच्या जेवणाची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी 50 कारागिर आणि 20 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर पदार्थ बनवण्यासाठी आणि ते वाढण्यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय पदार्थांची टेस्ट बिघडणार नाही, याचीही काळजी घेतली जात आहे.

बिहारमधून येताहेत लोक

दरम्यान, शिवांगीच्या लग्नाच्या निमित्ताने नदवां गावात सजावट करण्यात येत आहे. संपूर्ण गावात रोषणाई केली जात आहे. पक्के रस्ते बनवले जात आहेत. गावात 24 तास वीज राहिल अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच फिरते शौचालयेही ठेवण्यात आले आहेत. येथील एका मैदानावर घोड्यांची रेस होणार आहे. त्यामुळे गावातील तयारी पाहण्यासाठी संपूर्ण बिहारमधून रोज लोक येत आहेत. त्यामुळे या गावात वर्दळ पाहायला मिळत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us