CJP ला आणखी एक मोठं यश, आंदोलनाचा इशारा देताच सगळे गुन्हे मागे; नेमका निर्णय काय?
अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीला आणखी एक मोठे यश मिळाले. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करताना बिहारमध्ये अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता बिहार पोलिसांनी हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे.

अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील कॉकरोच जनता पार्टीला आणखी एक मोठे यश मिळाले. नीट पेपरफुटी विरोधात आंदोलन करताना बिहारमध्ये अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र आता बिहार पोलिसांनी हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे. तसेच अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना लवकरच सोडले जाणार आहे. आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत कॉकरोच जनता पार्टीने आंदोलकांवरी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता बिहार सरकारने हे गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली आहे.
गुन्हे मागे घेतले जाणार
नीट-यूजी परीक्षेतील पेपरफुटीनंतर बिहारमधील अनेक भागांत विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी विविध ठिकाणी गुन्हे दाखल केले होते आणि काही जणांना ताब्यातही घेतले होते. आता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, निश्चित काळापर्यंत झालेल्या आंदोलनांबाबत प्रशासनाने नरम भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता आंदोलकांनवरील गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे शेकडो विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बिहार सरकारच्या चार मोठ्या घोषणा
- 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत बिहारमध्ये झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही व्यक्तीविरोधात दंडात्मक, सूडभावनेतून किंवा प्रतिकूल कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
- 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपूर्वी नोंदविण्यात आलेले सर्व एफआयआर, तक्रारी आणि बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसा मागे घेण्याची कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येणार आहे.
- निश्चित कालमर्यादेपूर्वी दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये अटक किंवा ताब्यात घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि आंदोलनकर्त्यांची शक्य तितक्या लवकर सुटका करण्यात येणार आहे.
- 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपूर्वी दाखल झालेल्या प्रकरणांमध्ये नामनिर्देशित व्यक्तींविरोधात भविष्यातही या प्रकरणांच्या संदर्भात कोणतीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कारवाई केली जाणार नाही.
तेजस्वी यादव यांनी सरकारला दिला होता अल्टिमेटम
तेजस्वी यादव यांनी सरकारला 27 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत मुदत दिली होती. यादव यांनी इशारा दिला होता की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर आणि गुन्हे मागे घेतले नाहीत, तर बिहारमध्ये मोठे आंदोलन छेडले जाईल. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिले होते. आता बिहार सरकारने गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.