AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आता केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, CJP च्या आंदोलकांबाबत सर्वात मोठा निर्णय, उचललं थेट मोठं पाऊल

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं, या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला, मात्र आता या आंदोलकांबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! आता केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये, CJP च्या आंदोलकांबाबत सर्वात मोठा निर्णय, उचललं थेट मोठं पाऊल
केंद्र सरकारचा सीजेपी आंदोलकांबाबत मोठा निर्णय Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 27, 2026 | 9:12 PM
Share

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) कडून मोठं आंदोलन उभारण्यात आलं होतं. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चा काढला, परंतु या मोर्चाला हिंसक वळण लागलं. पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आले, पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला, या घटनेत अनेक आंदोलक जखमी झाले तर दुसरीकडे आंदोलकांनी देखील पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप होत आहे. दरम्यान आता पोलिसांकडून या आंदोलनात सहभागी झालेल्या काही आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे, पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. या संदर्भात सीजेपीकडून केंद्र सरकारकडे तक्रार करण्यात आली आहे, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाल्याचं सीजेपीने आपल्या तक्रारीमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान सीजेपीकडून मिळालेल्या तक्रारीनंतर आता केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचं पहायला मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यासंदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या रांज्यामध्ये आंदोलकांविरोधात कारवाईला सुरुवात झाली आहे, त्या राज्यांबाबत आता केंद्र सरकारच्या वतीने माहिती गोळा करण्यात येत आहे. तसेच ज्या लोकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचं देखील केंद्र सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं आहे.

दरम्यान आज पुन्हा एकदा कॉकरोच जनता पार्टीची पत्रकार परिषद पार पडली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना सीजेपीच्या वतीने असा आरोप करण्यात आला आहे की, आंदोलकांवर पोलिसांकडून कारवाईला सुरुवात झाली आहे. जर ही कारवाई अशीच सुरू राहिली तर आम्ही पुन्हा एकदा जंतर -मतंरवर आंदोलनाला सुरुवात करू. कॉकरोच जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ता आशुतोष रांका यांनी असा आरोप केला आहे की, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे, तसचे दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये छापेमारी सुरू आहे, सरकारने आधीच आश्वासन दिलं आहे की, कोणत्याही आंदोलकावर कारवाई होणार नाही, जर आमच्यावर कारवाई होत असेल तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, दरम्यान या इशाऱ्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, जे आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

Follow Us
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम