भारतात असलेले ‘हे’ 4 काचेचे पूल करा एक्सप्लोर, तुम्ही परदेशी ठिकाणे जाल विसरून

काचेच्या पुलांचा विचार केला जातो तेव्हा बहुतेक लोकांना परदेशातील ठिकाणं आठवतात. पण ऐवढ्या लांब प्रत्येकाला जाणे शक्य होत नाही. यासाठी तुम्हालाही डोंगरांच्या सानिध्यात बांधलेल्या पारदर्शक काचेच्या पुलावर चालण्याचा थरार अनुभवायचा असेल, तर या लेखात तुम्हाला भारतातील 4 काचेच्या पुलांबद्दल सांगणार आहोत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. चला तर मग आजच्या या लेखात आपण या पुलांबद्दल जाणुन घेऊयात...

भारतात असलेले हे 4 काचेचे पूल करा एक्सप्लोर, तुम्ही परदेशी ठिकाणे जाल विसरून
| Edited By: | Updated on: Jun 25, 2025 | 7:39 PM

आपण भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे असलेल्या नैसर्गिक सौंदर्याबद्दल बोललो तर मनाला मोहून टाकणारी अद्भुत आणि सुंदर ठिकाणे आहेत. आपल्या देशात ऐतिहासिक किल्ले आणि राजवाड्यांपासून ते समुद्राच्या उंच लाटांच्या रोमांच, डोगरांचे सौंदर्य आणि शांतता ते आश्चर्यकारक वास्तुकलापर्यंत सर्व काही दर्शविणारी वास्तुकला आपल्या भारतात आहेत, त्यापैकी एक म्हणजे काचेचा पूल. उंच डोंगर आणि खोल दऱ्या त्यावर बांधलेल्या पारदर्शक पुलावर चालण्यासाठी धाडस असणे खुप महत्त्वाचे आहे आणि एक अद्भुत ॲडव्हेंचर अनुभवण्यासाठी लोकं अशा ठिकाणी जात असतात. अशातच जेव्हा या ठिकाणी फिरायला जाण्याचा विचार येतो तेव्हा अनेकजण परदेशात जाण्याचा प्लॅन करतात. पण अशावेळेस प्रत्येकजण बाहेर परदेशात जाऊ शकत नाही. पण आता आपल्या देशातच 4 वेगवेगळ्या ठिकाणी काचेचे पूल आहेत जे तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ज्यावर चालणे तुमच्यासाठी एक संस्मरणीय क्षण असेल.

काचेचे पूल असोत किंवा चिनाब पूल असोत किंवा पंबन पूल असोत, आपल्या देशाने अद्भुत संरचना सादर केल्या आहेत. जर तुम्हाला प्रवास करण्याची आवड असेल आणि तुम्हाला संपूर्ण जग फिरायचे असेल, तर परदेशात जाण्यापूर्वी तुम्ही आपल्या देशापासून सुरुवात करावी, कारण येथेही बरेच अशी ठिकाण आहेत जी एक्सप्लोर करता येतात, तसेच या ठिकाणी अनेक परदेशी पर्यटक येथे एक्सप्लोर करण्यासाठी येतात. तर आजच्या या लेखात आपण भारतातील चार काचेचे पूल कोणते आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात…

समुद्रावरील काचेचा पूल

दक्षिण भारतात तमिळनाडू येथील कन्याकुमारीच्या समुद्र काठावर एक काचेचा पूल बांधण्यात आला आहे. हा पूल 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद पूल तुम्हाला आयुष्यभराचा अविस्मरणीय क्षण देईल, कारण तो समुद्रावर बांधला गेला आहे. हा पूल विवेकानंद रॉक मेमोरियलला तिरुवल्लुवर पुतळ्याशी जोडतो. जर तुम्ही दक्षिण भारताकडील ठिकाणांना एक्सप्लोर करण्याचा प्लॅन करत असाल तर या पुलाला नक्की भेट द्या. खास गोष्ट म्हणजे हा पूल धनुष्याच्या आकारात बांधला गेला आहे.

कन्याकुमारीचा काचेचा पूल –

बिहारमध्येही काचेचा पूल आहे

चविष्ट जेवण आणि तेथील परंपरांसाठी ओळखले जाणारे बिहार पर्यटनाच्या बाबतीतही मागे नाही. येथे अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. तसेच येथील राजगीर बौद्ध आणि जैन धर्माच्या अनुयायांसाठी हे ठिकाण ओळखले जाते. याशिवाय येथे एक काचेचा पूल देखील बांधण्यात आला आहे जेथून निसर्गाचे अद्भुत दृश्य दिसते. हा पूल 85 फूट लांब आणि त्याची रुंदी 6 फूट आहे, तर तो 200 फूट उंचीवर बांधला आहे.

बिहारचा काचेचा पुल –

सिक्कीम ग्लास स्कायवॉक

पर्यटनाबद्दल बोलायचे झाले तर, सिक्कीम हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे. जिथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात जाता येते. येथे बांधलेल्या काचेच्या स्कायवॉकवर चालणे तुमच्यासाठी खरोखरच एक रोमांचक अनुभव असेल. हे सिक्कीमच्या पेलिंगमध्ये 7200 फूट उंचीवर बांधले गेले आहे. येथून तुम्हाला हिमालयाचे विहंगम दृश्ये पाहता येतील.

सिक्कीम पुल येथे पाहा –

केरळचा हा काचेचा पूलही अद्भुत आहे

केरळ हे देखील एक हिरवेगार ठिकाण आहे, जिथे मोठ्या संख्येने पर्यटक भेट देण्यासाठी येतात. जर तुम्ही येथे फिरायला जाण्याचा प्लॅन केलात तर तुम्ही वागमोन अॅडव्हेंचर टुरिझम पार्कमध्ये बांधलेल्या काचेच्या पुलाला भेट द्यावी. हा काचेचा पूल 40 मीटर लांब आहे आणि हिरव्यागार डोंगरांमध्ये 120 फूट उंचीवर बांधला गेला आहे, जिथून खोल हिरव्या दऱ्यांचे एक विलक्षण दृश्य देखील दिसते.

केरळ काचेचा पुल –

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि आपली समृद्ध संस्कृती आपल्याला जगात खास बनवते. पर्यटनाबद्दल बोलायचे झाले तर, परदेशी पर्यटक आपल्या संस्कृतीने प्रभावित होतात, शिवाय नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक ठिकाणे आणि उत्कृष्ट स्थापत्य कलाकुसरीनेही प्रभावित होतात. प्रवास म्हणजे केवळ सुंदर ठिकाणे पाहणे नाही तर स्वतःमध्ये नवीन अनुभव आणि ज्ञान जोडणे देखील आहे.