भाजपने सर्वात मोठा डाव टाकला; पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी दिवंगत पीएच्या आईला दिली उमेदवारी

भाजपने सर्वात मोठा डाव टाकला आहे. पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी दिवंगत पीएच्या आईला देखील उमेदवारी दिली आहे.

भाजपने सर्वात मोठा डाव टाकला; पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांनी दिवंगत पीएच्या आईला दिली उमेदवारी
west bengal news
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 15, 2026 | 1:46 PM

भाजपने पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपने रेजीनगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत सखराव सरकार यांना उमेदवारी दिली आहे. तर नंदीग्रामसारख्या हायप्रोफाईल पोटनिवडणुकीत हासीरानी रथ यांना उमेदवारी दिली आहे. हासीरानी रथ या मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे दिवगंत पीए चंद्रनाथ रथ यांची आई आहेत.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रनाथ रथ यांच्या आईची मे महिन्यात हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता पोटनिवडणुकीत हासिरानी रथ यांना उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना शुभेंदू अधिकारी हजर राहणार आहेत. चंद्रनाथ रथ हत्याकांड प्रकरणात सीबीआय तपास करत आहे. या प्रकरणात आतापर्यंत अनेक लोकांना अटक केली आहे.

निवडणूक आयोगाने 9 सप्टेंबर रोजी पोटनिवडणुकीची घोषणा झाली. त्यानंतर अनेकांना भाजपच्या उमेदवारांच्या यादीची प्रतिक्षा होती. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात 6 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर 9 ऑक्टोबर रोजी या दोन्ही जागेचा निकाल जाहीर होईल. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघ हा शुभेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला मानला जातो. मुख्यमंत्री शुभेंदू यांनी यावर्षी झालेल्या निवडणुकीत नंदीग्रामसहित भवानीपूर विधानसभा मतदारसंघातूनही विजय मिळवला. भवानीपूर मतदारसंघातून शुभेंदू यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला. मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर नंदीग्रामची जागा सोडली. आता नंदीग्राममध्येच पोटनिवडणूक होत आहे. रेजीनगर विधासभा मतदारसंघ हा हुमायूं कबीर यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झाला आहे.

तत्पूर्वी, नंदीग्राम, रेजीनगर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटासहित काँग्रेस, डावे पक्षांनी देखील उमेदवार उतरवले आहेत. ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीने नंदीग्राममधून संचिता प्रधान यांना उमेदवारी दिली. तर बंडखोरांनी मोहम्मद एतेशामुल हक यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने मिलन प्रधान, सीपीआयने शांती गोपाल गिरी यांना उमेदवारी दिली आहे. हुमांयू कबीर यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रेजीनगरमधून ममता बॅनर्जी यांनी रबीउल आलम यांन उमेदवारी दिली आहे. बंडखोर गटाने सफीउज्जमा शेख यांना तिकीट दिलं आहे. काँग्रेसने मोहम्मद अब्दुल्लाहिल कॉफी यांना उमेदवारी दिली आहे. तर डाव्यांनी सैय्यद असद अली यांना उमेदवारी दिली. तर AJUP पक्षाच्या हुमांयू कबीर यांनी मुलगा गुलाम नबी आजाद यांना तिकीट दिलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us