जरांगे मुंबईच्या दिशेने निघताच एकनाथ शिंदेंचे आवाहन, म्हणाले गणेशोत्सवात कोणतंही विघ्न…मराठ्यांचं वादळ मुंबईत धडकणार का?
आक एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, मराठ्यांच्या आरक्षणाबाबते मुद्दे सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मराठा आरक्षणासंबंधी सरकार सकारात्मक आहे. मराठ्याना न्याय देताना इतर समाजावर अन्याय होऊ दिला नाही. कोणत्याही समाजाचं आरक्षण, सवलती आम्ही कमी केल्या नाही. जरांगेंनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकार आणि पोलिसांप्रमाणे जरांगेंनीही तशी भूमिका घ्यावी, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येता कामा नये, गणपती उत्सवामध्ये कोणाचीही गैरसोय होऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे

एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, मराठ्यांच्या आरक्षणाबाबते मुद्दे सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला. मराठा आरक्षणासंबंधी सरकार सकारात्मक आहे. मराठ्यांना न्याय देताना इतर समाजावर आम्ही अन्याय होऊ दिला नाही. कोणत्याही समाजाचं आरक्षण, सवलती आम्ही कमी केल्या नाही. पण जरांगेंनी सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे. सरकार आणि पोलिसांप्रमाणे जरांगेंनीही तशी सहकार्याची भूमिका घ्यावी, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. गणेशोत्सवात कोणतंही विघ्न येता कामा नये, गणपती उत्सवामध्ये कोणाचीही गैरसोय होऊ नये असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येणार असल्याचं म्हटलं होत. त्यानंतर आज त्यांनी मुंबईकच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. त्यांनी 19 सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचणार आहोत आणि पुन्हा एकदा मराठ्यांनीही सगळ्यांनी मुंबईत यावं असं म्हटलं होतं. त्यानंतर मराठ्यांना दिलेला शब्द मागे घेणार नाही. कोर्टाने परवानगी नाकारली तरी मी एकटाच मुंबईला येईल असं म्हणाले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रत्येकाला लोकशाहीनं अधिकार दिला आहे. पण टीकेमध्ये समाजाची बाजू असावी, समाजाला न्याय देण्याची भूमिका ठिक आहे, पण त्यामध्ये राजकीय भूमिका असू नये. टीकेमध्ये तुम्ही राजकीय भूमिका घेऊ नये. आंदोलनाची, समाजाची लाईन सोडून राजकीय भूमिका घेऊ नये. एवढचं सांगतो की सरकारने कधीही आढमुठी भूमिका घेतलेली नाही. त्यामु सरकार काही देत नसेल तर ठिक आहे. पण सरकारने मराठा समाजासाठी जे जे देय्य आहे. ते ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
