ममतांच्या पोस्टरवरील गुटख्याची पिचकारी भाजप नेत्यानं पुसली, काट्याची टक्कर असलेल्या बंगालमध्ये दिलासादायक चित्र

| Updated on: Feb 02, 2021 | 10:39 AM

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरवर समाजकंटकाकडून गुटखा खाऊन थुंकण्यात आले होते भाजप नेते अखिल विश्वास यांनी ते पोस्टर स्वच्छ केले. Akhil Biswas Mamata Banerjee

ममतांच्या पोस्टरवरील गुटख्याची पिचकारी भाजप नेत्यानं पुसली, काट्याची टक्कर असलेल्या बंगालमध्ये दिलासादायक चित्र
ममता बॅनर्जी यांचं पोस्टर स्वच्छ करताना भाजप नेता
Follow us on

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजप निवडणुकीत विजय मिळवायचा या निर्धारानं तयारीला लागले आहेत. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. या दरम्यान एक चांगला प्रसंग समोर आला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या पोस्टरवर समाजकंटकाकडून गुटखा खाऊन थुंकण्यात आले होते. हे पाहिल्यानंतर अखिल विश्वास (Akhil Biswas) या भाजप नेत्यानं ममता बॅनर्जी यांचा फोटो स्वच्छ केला आहे. (BJP leader Akhil Biswas cleans Mamata Banerjee’s poster with wet cloth as some miscreants spit guthkha on the poster.)

भाजप नेत्याची संवेदनशीलता

सिलीगुडी जिल्ह्यातील भाजप उपाध्यक्ष अखिल विश्वास (Akhil Biswas) हे वकिली करतात. सिलीगुडी न्यायालयाबाहेर त्यांना ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरवर अज्ञात समाजकंटकांनी गुटख्याच्या पिचकाऱ्या मारलेल्या पाहायला मिळाल्या. काही वेळ अखिल विश्वास यांनी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते पोस्टर स्वच्छ करतील याची वाट पाहिली. मात्र, टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी त्या पोस्टरकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर त्यांनी स्वत: तो कापडानं फोटो स्वच्छ केला.

अखिल विश्वास काय म्हणतात?

भाजप नेते अखिल विश्वास या प्रकरणाबद्दल सांगतात, सिलीगुडी न्यायालयाबाहेर ममता बॅनर्जी यांच्या पोस्टरवर कुणीतरी गुटखा खाऊन थुंकले होते. धक्कादायक बाब अशी की तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते तो फोटो पाहून स्वच्छ करण्याऐवजी बघजतीन पार्कमध्ये त्यांच्या सभेसाठी जात होते, त्यापैकी कोणीही ते पोस्टर स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला नाही. अखेर देशाचा संवदेनशील नागरिक या नात्यांनं ममता बॅनर्जी यांचं पोस्टर स्वच्छ केल्याचं अखिल विश्वास यांनी सांगितले.

ममता बॅनर्जी यांची बजेटवरुन केंद्रावर टीका

विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवून मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात पश्चिम बंगालला झुकते माप दिले आहे. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता- सिलीगुडीसाठी नॅशनल हायवे प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. आगामी निवडणुकीत भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली आहे. आम्हाला चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. ‘मा, माटी, मानुष’ याच्या जोरावर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार पुन्हा निवडून येईल. भाजप हा केवळ गॅसचा फुगा आहे, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.

संबंधित बातम्या

‘…तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन’, भर सभेत प्ले कार्ड्स दाखवल्यामुळे ममता बॅनर्जी भावूक

प. बंगालमध्ये आम्ही 200 हून अधिक जागा जिंकू; जेपी नड्डा यांचा दावा

BJP leader Akhil Biswas cleans Mamata Banerjee’s poster with wet cloth as some miscreants spit guthkha on the poster.