‘…तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन’, भर सभेत प्ले कार्ड्स दाखवल्यामुळे ममता बॅनर्जी भावूक

'...तर मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देईन', भर सभेत प्ले कार्ड्स दाखवल्यामुळे ममता बॅनर्जी भावूक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भर सभेत भावनिक झाल्या (Mamata Banerjee emotional).

चेतन पाटील

|

Dec 09, 2020 | 4:22 PM

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या एका सभेत काही लोकांनी प्ले कार्ड दाखवत त्यांच्या विरोधात निदर्शने दिले. या घटनेमुळे मंचावर उपस्थित ममता बॅनर्जी प्रचंड भावूक झाल्या. “मी कित्येकवर्षांपासून जे काम केलं ते दुसरं कुणी करुन दाखवलं तर मी राजीनामा देईन”, असं ममता यावेळी म्हणाल्या (Mamata Banerjee emotional).

ममता बॅनर्जी यांची पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना या राज्यातील बनगांवच्या गोपालनगर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. गोपालनगरमध्ये त्या मतुआ समजाला संबोधित करत होत्या. मात्र, त्यांच्या भाषणावेळी काही लोकांनी त्यांच्या विरोधात प्ले कार्ड्स दाखवले. त्यामुळे ममता बॅनर्जी भावनिक झाल्या (Mamata Banerjee emotional).

“चार पाच लोग ज्याप्रकारे प्ले कार्ड्स दाखवून सभा उधळण्याचा प्रयत्न करत आहेत ते योग्य नाही. कुणी काही मागितलं, काही सांगितलं तर सरकार त्यांच्या सर्व गोष्टी ऐकत आहे. त्यानुसार सरकार कामही करत आहे. पण सरकारची देखील क्षमता आहे. सरकारलादेखील काही मर्यादा आहेत. आम्ही सर्वांनाच खूश करु शकत नाहीत. मी माझ्या 9 वर्षांच्या कार्यकाळात जे काही केलं ते जर कुणी करुन दाखवलं तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन”, असं ममता म्हणाल्या.

“कधी-कधी मला असं वाटतं की, मी या खूर्चीवर बसू नये. कारण मी लोकांना सर्वकाही दिलं. मात्र, लोक समाधानी नाहीत. मी मेदनीपूर गेली होती. तिथे लोकांनी दोन पिशव्या भरुन चिठ्ठ्या दिल्या. मी जिथे जाते तिथे लोक चिठ्ठ्या देतात”, असा खेद ममता यांनी व्यक्त केला.

“मी राज्यातील 10 कोटी जनतेपैकी साडे नऊ कोटी जनतेसाठी तरी काहीतरी केलं आहे. प्रत्येकाला सरकारी योजनेशी जोडलं. मात्र, मी सर्वांनाच खूश करु शकत नाही. काही लोक आपल्या मागण्यांसाठी अशाप्रकारे सभा उद्ध्वस्त करु शकत नाहीत. जर तुमच्या काही मागण्या आहेत तर कायदेशीरपणे मागा. मात्र अशाप्रकारे वागू नका. माझं खरंच खूप मन दुखावलं. जर काही चूक झाली असेल तर माफ करा”, अशी भावनिक साद ममता बॅनर्जी यांनी घातली.

हेही वाचा : राज्य सरकारच्या सर्वोच्च न्यायालयातील युक्तीवादावर OBC समाजाचा आक्षेप! 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें