AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये मोठा भूकंप; आठवडाभरात तिसऱ्या बड्या नेत्याचा आमदारकीचा राजीनामा, नेमकं कारण काय?

बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ होताना दिसत आहे. आठवड्याभरात तिसऱ्या बड्या नेत्याने पदाचा राजीनामा दिला आहे.

भाजपमध्ये मोठा भूकंप; आठवडाभरात तिसऱ्या बड्या नेत्याचा आमदारकीचा राजीनामा, नेमकं कारण काय?
| Updated on: Jul 31, 2026 | 6:21 PM
Share

बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शहजाद पुनावाला यांनी पदाचा राजीनामा दिला. पुनावाला यांच्यानंतर बिहारमध्ये बड्या नेत्याने आमदारकीचा राजीनामा दिला आहे. देवेश कुमार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याने बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. देवेश कुमार यांनी त्यांच्या आमदारकीचा राजनामा सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सोपवला आहे. परंतु देवेंश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्वाधिक चर्चा मंत्री दीपक प्रकाश यांची होऊ लागली आहे.

दीपक प्रकाश यांच्या मंत्रि‍पदावरील नियुक्तीचे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं. त्यानंतर भाजप देखील सक्रिय झालं. त्यामुळे देवेश कुमार यांचा विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा महत्त्वाचा मानला गेला. देवेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे दीपक प्रकाश यांच्या विधान परिषदेवर जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच त्यांच्या मंत्रि‍पदालाही संरक्षण प्राप्त झालं.

देवेंश कुमार यांचा आमदारकीचा राजीनामा

देवेश कुमार यांनी आज शुक्रवारी राजीनामा दिला. विधानपरिषदेत आज भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सवारगी आणि इतर नेते पोहोचले. त्यांच्यासोबत विधान परिषद सभापती अवधेश नारायण सिंह देखील होते. तर देवेश कुमार विधानपरिषदेच्या मागच्या दालनातून आले. देवेश कुमार यांनी विधान परिषद सभापती अवधेश नारायण सिंह यांच्याकडे राजीनामा दिला. यावेळी भाजपचे इतर नेते देखील होते. देवेश कुमार हे राजीनामा देऊन सभागृहातून निघून गेले. देवेश कुमार यांच्या राजीनाम्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनी भाजप प्रदेशाध्यक्ष संजय सरावगी यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजप नेते संजय सरावगी यांनी प्रतिक्रिया देणे टाळले. देवेश कुमार यांच्या राजीनाम्यामुळे दीपक प्रकाश यांचा विधानपरिषदेवर निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दीपक प्रकाश हे विधान परिषद सदस्य झाले. तर दीपक प्रकाश यांच्या मंत्रि‍पदाला घटनात्मक संरक्षण मिळेल.  देवेश कुमार यांचा राजीनामा फक्त विधान परिषदेच्या रिक्त जागेसाठी नाही. तर दीपक प्रकाश यांच्या राजकीय वाटचालीसाठी महत्त्वाचं पाऊल म्हणून पाहिलं जात आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी