AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या गोटातून सर्वात मोठी बातमी, जेपी नड्डा यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा, पण…

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (जेपी नड्डा) यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी जेपी नड्डा यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

भाजपच्या गोटातून सर्वात मोठी बातमी, जेपी नड्डा यांचा राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा, पण...
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Mar 04, 2024 | 9:02 PM
Share

नवी दिल्ली | 4 मार्च 2024 : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा (जेपी नड्डा) यांनी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राज्यसभेच्या सभापतींनी जेपी नड्डा यांचा राजीनामा स्वीकारला आहे. जेपी नड्डा यांनी हिमाचल प्रदेशच्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला आहे. राज्यसभेची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत ते गुजरातच्या जागेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी हिमाचलच्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांनी हिमाचलच्या जागेचा राज्यसभेचा राजीनामा दिला असला तरी ते गुजरातच्या राज्यसभेच्या जागेवरुन खासदार असणार आहेत.

राज्यसभेकडून याबाबत अधिकृतपणे माहिती जारी करण्यात आली आहे. “हिमाचल प्रदेश राज्याचे प्रतिनिधित्व करणारे राज्यसभाचे सदस्य जगत प्रकाश नड्डा यांनी राज्यसभेत आपल्या जागेचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा राज्यसभेच्या सभापतींनी 4 मार्चला स्वीकारला आहे”, असं राज्यसभेच्या संसदीय बुलेटीनमध्ये म्हटलं आहे.

जेपी नड्डा आज नागपूर दौऱ्यावर

दरम्यान, जेपी नड्डा आज नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. नागपुरात भाजपचं आज ‘नमो युवा राष्ट्रीय महा संमेलना’चं आयोजन करण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने यातून ‘मिशन युवा मतदार’ ही मोहीम सुरु केली आहे. महाराष्ट्रातून आज भाजपच्या ‘नमो युवा राष्ट्रीय महा संमेलना’त एक लाख तरुण सहभागी झाले. या कार्यक्रमात विदर्भातील महायुतीचे सर्व खासदार, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचीदेखील या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. ‘नमो युवा राष्ट्रीय महा संमेलना’त तरुण खासदार म्हणून नवनित राणा मार्गदर्शन करणार असल्याची चर्चा होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुण मतदारांना डोळ्यांसमोर ठेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!