AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिन्याला घरभाडं द्यावं लागतं, आर्थिक परिस्थिती…, भाजपच्या बड्या नेत्यानं सोडला पक्ष, काँग्रेसमध्ये जायलाही तयार, पण एक अट…

दर महिन्याला घरभाडं द्यावं लागतं, घरमालक तेव्हा तुम्हाला हे विचारत नाही की, तुम्ही भाजपचे आहात की आणखी कोणत्या पक्षाचे? असंही त्यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. तसेच काँग्रेस प्रवेशासाठी त्यांनी एक अट ठेवली आहे.

महिन्याला घरभाडं द्यावं लागतं, आर्थिक परिस्थिती..., भाजपच्या बड्या नेत्यानं सोडला पक्ष, काँग्रेसमध्ये जायलाही तयार, पण एक अट...
BJPImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 19, 2026 | 2:11 PM
Share

भाजप नेते आणि पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी भाजपमधील आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या पहिल्या मुलाखतीमध्ये अनेक खुलासे केले आहेत. माझी आर्थिक परिस्थिती आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे मला हे पाऊल उचलावं लागलं आहे, असं या मुलाखतीमध्ये शहजाद पुनावाला यांनी म्हटलं आहे. महिन्याच्या एक तारखेलाच घरमालकाला घर भाडं हवं असतं, तो हे म्हणत नाही की, तुम्ही भाजपचे आहात की अजून कोणत्या पक्षाचे. भाजपच काय जगातील कोणताही पक्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना सॅलरी देत नाही. त्यामुळे अशा स्थितीमध्ये पक्षासाठी 24 तास कार्य करणं शक्य नाही, असंही यावेळी पुनावाला यांनी म्हटलं आहे.

भाजप सोडण्याचं कारण काय?

शहजाद पूनावाला हे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते होते, मात्र त्यांनी आता भाजपमधील आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे, एवढंच काय तर त्यांनी भाजपच्या प्राथमीक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिला आहे. आता ही जबाबदारी मी सांभाळू शकत नाही, कारण आयुष्यात समोर जी परिस्थिती आहे, तिच्यापासून मी आता जास्त दिवस दूर राहू शकत नाही. माझ्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे मी माझ्या आईची सेवा करू शकत नाहीये, तसेच माझी आर्थिक परिस्थिती आणि वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे मी भाजपचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्यांना पगार देणं हे भाजपच काय कोणत्याही पक्षाचं काम नाहीये, कारण तुम्हाला पक्षाचे विचार आवडतात, म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी काम करत असतात, असंही यावेळी पुनावाला यांनी म्हटलं आहे.

दरम्यान तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का? असा सवालही यावेळी पुनावाला यांना विचारण्यात आला, यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की मी काँग्रेसमध्ये जाईल, परंतु त्यासाठी एक अट आहे, ती म्हणजे तुम्हाला त्यासाठी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना हटवावं लागेल तसेच नेहरू यांनी ज्या काही चुका केल्या आहेत, त्याबद्दल माफी मागावी लागेल, असं पुनावाला यांनी म्हटलं आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात