BJP West Bengal : ममता बॅनर्जींचा आदेश पलटला, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बकरी ईद संदर्भात मोठा निर्णय

BJP West Bengal : आता बंगालमध्ये सरकार बदललं आहे. भाजप सत्तेवर आहे. नव्या सरकारने ती जुनी घोषणा बदलली आहे. सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून एकापाठोपाठ धडाधड निर्णय घेत आहेत.

BJP West Bengal : ममता बॅनर्जींचा आदेश पलटला, मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचा बकरी ईद संदर्भात मोठा निर्णय
CM suvendu adhikari government
Image Credit source: PTI
| Updated on: May 23, 2026 | 7:32 PM

पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल झाला आहे. भाजपचं सरकार आलं आहे. सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाल्यापासून एकापाठोपाठ धडाधड निर्णय घेत आहेत. पश्चिम बंगालमध्ये सरकारी अनुदान घेणार्‍या मदरशांमध्ये वंद मातरम बंधनकारक केल्यानंतर आता बकरी ईदबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. बकरी ईदच्या सुट्टयांसंदर्भात त्यांनी घेतलेला निर्णय चर्चेत आहे. आधी दोन दिवसांची सुट्टी होती. पण ममता बॅनर्जी सरकारच्या काळातील हा निर्णय आता बदलण्यात आला आहे. मागच्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तत्कालीन राज्य सराकरने एक नोटिफिकेशन जारी केलेलं. त्यावेळी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेसचं शासन होतं. त्यांनी बकरी ईदला दोन दिवसांच्या सुट्ट्यांची घोषणा केली होती. 26 आणि 27 मे. ईदच्या एकदिवस आधी आणि दुसरी ईदच्या दिवशी.

पण आता बंगालमध्ये सरकार बदललं आहे. भाजप सत्तेवर आहे. नव्या सरकारने ती जुनी घोषणा बदलली आहे. आता फक्त एकच दिवसाची सुट्टी मिळेल. ती सुद्धा 28 मे रोजी. हे तीन मोठे बदल झाले आहेत. दोन दिवसांच्या जागी एक दिवसाची सुट्टी करण्यात आली आहे. 26-27 मे च्या जागी आता 28 मे रोजी सुट्टी असेल. नव्या भाजपं सरकारने हा निर्णय घेतला आहे. ममता सरकारचा निर्णय पलटला आहे.

नवीन आदेश जारी

राज्य सरकारच्या या निर्णयाकडे प्रशासकीय बदल म्हणून पाहिलं जात आहे. बकरी ईदसाठी सुट्टीच्या दिवसाचा बदल झाल्यानंतर आता सरकारी कर्मचारी, शाळा आणि अन्य संस्थांसाठी नवीन शेड्यूल लागू होईल. राज्यात अनेक प्रशासकीय आणि धोरणात्मक बदल सुरु असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने आधीच्या अधिसूचनांची समीक्षा सुरु केली आहे. त्याच क्रमात बकरी ईदच्या सुट्टीबद्दल नवीन आदेश जारी केला आहे.

त्याच हिशोबाने तयारी सुरु होती

आधीच्या नोटिफिकेशननुसार दोन दिवसांची सुट्टी असल्याने सरकारी कार्यालय आणि संस्थांमध्ये त्याच हिशोबाने तयारी सुरु होती. आता नव्या आदेशानंतर एकदिवसाची सुट्टी असेल. नुकताच पश्चिम बंगाल सरकारने सिलीगुडी कॉरिडोरची 120 एकर जमीन केंद्र सरकारला सोपवली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा निर्णय आहे.

Follow Us