फटाके फोडल्याने आजार बरे होतात, भाजपा आमदाराचे गजब विधान, लोकांमधून प्रचंड संताप!

पापिया अधिकारी एका कालीपूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होण्यास मदत मिळते, असे विधान केले.

फटाके फोडल्याने आजार बरे होतात, भाजपा आमदाराचे गजब विधान, लोकांमधून प्रचंड संताप!
papiya adhikari and firecracker
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 09, 2026 | 9:50 PM

 BJP MLA on firecracker : दिवाळीनंतर देशातील अनेक शहरांमध्ये वायुप्रदूषण आणि फटाक्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे चिंता व्यक्त केली जातेय. असे असताना आता पश्चिम बंगालमधील भाजपच्या आमदार पापिया अधिकारी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फटाके फोडल्यास आजार बरे होतात, अशा आशयाचं विधान त्यांनी केलंय. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर काही लोक संताप व्यक्त करतायत. तर काही लोकांनी संताप व्यक्त केलाय. पापिया अदिकारी या पश्चिम बंगालमधील टॉलीगंज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत.

नेमकं काय म्हणाल्या भाजप आमदार?

पापिया अधिकारी एका कालीपूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी फटाके फोडल्याने अनेक आजार बरे होण्यास मदत मिळते, असे विधान केले. तसेच पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनीही फटाके फोडण्याबाबत भूमिका मांडली असल्याचा उल्लेख त्यांनी केला. कालीपूजा फटाक्यांशिवाय कशी पूर्ण होणार? आम्ही फटाके फोडणारच; मात्र पोलिसांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करू, असेही या व्हिडीओत त्या बोलताना दिसतायत.

Loading...

मी माफी मागते, माझे विधान मी…

पापिया अधिकारी यांच्या या व्हिडीओनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली आहे. वाढता विरोध लक्षात घेऊन पापिया अधिकारी यांनी आपल्या विधानाबाबत स्पष्टीकरण दिले. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. दिवे लावण्याचा उत्सव आहे. वाईट गोष्टी नष्ट व्हाव्यात हाच यामागे मुख्य उद्देश आहे. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागते. मी माझे विधान मागे घ्यायला तयार आहे. मी हे विधान मागे घेतलं असंच समजा, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, पापिया अधिकारी यांनी 2021 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2026 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी टॉलीगंज मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे नेते अरूप बिस्वास यांचा पराभव करून विजय मिळवला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us