ज्याची भीती होती तेच झालं, अमेरिकेमध्ये हाहाकार, 13 हजार विमानांची उड्डाणं रद्द, संपूर्ण देश.., ट्रम्प यांच्याकडून थेट आणीबाणीची घोषणा

अमेरिकेमध्ये सध्या मोठा गोंधळ उडाला आहे, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देशात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, मोठी बातमी समोर आली आहे.

ज्याची भीती होती तेच झालं, अमेरिकेमध्ये हाहाकार, 13 हजार विमानांची उड्डाणं रद्द, संपूर्ण देश.., ट्रम्प यांच्याकडून थेट आणीबाणीची घोषणा
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 25, 2026 | 10:10 PM

अमेरिका सध्या एका मोठ्या संकटात सापडली आहे, हिमवादळानं अमेरिकेत थैमान घातलं आहे.  हिमवादळामुळे विमानांच्या उड्डाणांना मोठा धोका निर्माण झाला असून, त्यामुळे तब्बल 13 हजार विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, शनिवारी अमेरिकेच्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये हिवाळी वादळानं मोठा विध्वंस घडून आणला आहे. अनेक राज्यांमध्ये वीज पूर्णपणे गूल झाली असून, अंधारात राहण्याची वेळ आली आहे. अमेरिकेमध्ये सध्या भयंकर बर्फाचा वर्षावर होत असून, संपूर्ण रस्ते ब्लॉक झाले आहेत. सध्या स्थितीमध्ये अमेरिकेची जवळपास 40 टक्के लोकसंख्या ही या वादळाच्या रेड अलर्ट झोनमध्ये आहे, त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाकडून दक्षिण रॉकी पर्वतरांगेपासून ते न्यू इंग्लंडपर्यंत  हिमवादळाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास अति बर्फवृष्टीचा अंदाज व्यक्त केला असून, येथील लोक सध्या प्रचंड दहशतीखाली आहेत.

अमेरिकेच्या हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील काही तास देशात अति बर्फवृष्टी होण्याचा अंदाज आहे. आणि हा बर्फ लगेचच वितळणार नाहीये, तो हळुहळु वितळणार असून, त्याला वितळण्यासाठी वेळ लागणार आहे, त्यामुळे विस्कळीत जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी पुढील काही दिवस लागणार आहेत. या हिमवादळामुळे अमेरिकेमधील नागरिकांचे सध्या प्रचंड हाल सुरू आहेत, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून आणीबाणीची घोषणा

दरम्यान सध्या हिवाळी वादळामुळे अमेरिकेतली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे, त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक राज्यांमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. तसेच अनेक राज्यांना आपल्याकडे देखील आणीबाणीची घोषणा होईल अशी अशा आहे. याबाबत बोलताना अमेरिकेच्या गृह सचिव क्रिस्टी नोएम यांनी सांगितलं की, अनेक राज्यात आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे, जिथे जिथे आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे, तिथे सर्व प्रकारच्या सुविधा सरकारकडून पोहोचवण्याचा प्रयत्न होत आहे. आतापर्यंत तब्बल 13 हजार विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी अडकून पडले आहेत.