अमृतसरमध्ये धमाका, बॉम्ब ठेवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या हातातच फुटला

पंजाबमधील अमृतसरमध्ये बॉम्बचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून चौकशी सुरु केली आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून अजून काहीच माहिती देण्यात आली नाही.

अमृतसरमध्ये धमाका, बॉम्ब ठेवण्यासाठी आलेल्या व्यक्तीच्या हातातच फुटला
अमृतसरजवळ बॉम्बचा स्फोट
| Updated on: May 27, 2025 | 11:19 AM

पंजाबमधील अमृतसरामध्ये धमका झाला आहे. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास बॉम्बचा स्फोट झाला. जो व्यक्ती बॉम्ब ठेवण्यासाठी आला होता, त्याचा हातातच बॉम्ब फुटल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेत तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून चौकशी सुरु केली आहे. अमृतसर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली. यासंदर्भात पोलिसांकडून अजून काहीही माहिती देण्यात आली नाही.

प्राथमिक चौकशीत पोलिसांनी गँगस्टर किंवा दहशतवादी गटाने हा बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. या स्फोटात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तो भंगार विकणार असल्याचे सांगितले जात आहे. जुना बॉम्ब तोडण्याचा प्रयत्न करत असताना त्याचा स्फोट झाल्याचा अंदाज आहे. त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप या घटनेबाबत काहीच स्पष्टीकरण देण्यात आले नाही.

स्थानिक नागरिक काय म्हणतात…

अमृतसरमधील मजीठा रोडवर हा स्फोट झाल्यानंतर मोठा आवाज झाला. त्यामुळे जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच काही जणांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळी एक व्यक्ती ओरडत असताना लोकांना दिसला. त्याचे हात पाय तुटल्याचे नागरिकांना दिसले. त्या व्यक्तीची ओळख अजून झाली नाही. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी गर्दी नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

स्फोट झाला तो बॉम्ब कोणता होता? त्याची चौकशी सुरु केली आहे. त्या व्यक्तीला तो बॉम्ब कुठून मिळाला होता? त्यासंदर्भातील उत्तरही पोलिसांच्या चौकशीनंतर मिळणार आहे.

स्फोटानंतर पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षा दलांना अलर्ट करण्यात आले आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहचले आहे. फोरेन्सिक टीमही घटनास्थळावर दाखल झाली आहे. चौकशी केल्यावर या घटनेची माहिती माध्यमांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.