सीमावाद आणखी चिघळणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या आमदार, खासदारांवर थेट आरोप, नेमकं काय म्हणाले…

| Updated on: Dec 22, 2022 | 9:09 PM

महाराष्ट्रातील आमदार, खासदार सीमाप्रश्नी कोणताही कायदा पाळत नाहीत. तसेच महाराष्ट्रातील नेते मंडळी सीमावासियांना भडकवण्याचा प्रयत्न करतात असाही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

सीमावाद आणखी चिघळणार, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राच्या आमदार, खासदारांवर थेट आरोप, नेमकं काय म्हणाले...
Follow us on

बेळगावः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याबरोबर सीमावादावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सीमावादावर सामोपचाराने विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. एकाच वेळी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा झाल्याने सीमावादावर तोडगा निघेल अशी आशा होती. मात्र त्यानंतरही बसवराज बोम्मई यांनी सामोपचाराची भूमिका न घेता वारंवार चिथावणीखोर वक्तव्य आणि ट्विट करून सीमावाद भडकवण्याचे काम बसवराज बोम्मई यांनी केले.

अमित शाह यांच्याबरोबर चर्चा होऊनही बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर विधानसभेत चर्चा करताना त्यांनी महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव पास केला आणि सीमावादाला पु्न्हा एकदा वादात अडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

देशाच्या गृहमंत्र्यांबरोबर सीमाप्रश्नी चर्चा करूनही बसवराज बोम्मई यांनी कर्नाटक विधानसभेत महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही असा ठराव पारीत केला.

त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. त्याच बरोबर या सीमावादाबाबत आणि महाराष्ट्रातील नेत्यांबाबत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लोकसभा अध्यक्षानाच थेट पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्रातील आमदार, खासदार सीमाप्रश्नी कोणताही कायदा पाळत नाहीत. तसेच महाराष्ट्रातील नेते मंडळी सीमावासियांना भडकवण्याचा प्रयत्न करतात असाही त्यांनी गंभीर आरोप केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाल्यानंतर आणि दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री असूनही विधानसभेत बोम्मई यांनी महाराष्ट्राला एक इंचही जागा द्यायची नाही असा ठराव पारीत केला आहे.

सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही गावांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराजबोम्मई यांनी दावा केल्यानंतरही महाराष्ट्रातील नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेत सीमाप्रश्नी केंद्राने यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी केली होती.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी याबाबत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊनही बोम्मई यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे हा वाद मिठण्याऐवजी आणखी चिघळत चालल्याचे दिसून येत आहे.