
ऑपरेशन सिंदूरच्यावेळी भारताने पाकिस्तानला ब्रह्मोस मिसाइलची ताकद दाखवून दिली. भारत आता त्यापेक्षाही घातक मिसाइल बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, DRDO ने स्वदेशी स्क्रॅमजेट इंजिनच्या टेक्निकमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. भारता आता पुढच्या पिढीच हायपरसोनिक क्रूज मिसाइल ब्रह्मोस-II बनवण्यावर काम करत आहे. हे मिसाइल जास्त घातक आणि खतरनाक असेल. या Advance मिसाइलला जवळपास 8 मॅक म्हणजे (आवाजापेक्षा आठपट जास्त वेग) स्पीड आणि 1500 किलोमीटरच्या स्ट्राइक रेंजच्या दृष्टीने विकसित केलं जात आहे. संरक्षणाशी संबंधित सूत्रांनुसार भारत आणि रशियामध्ये ब्रह्मोस-II च्या संयुक्त विकासासाठी उच्चस्तरीय चर्चा पुन्हा सुरु होणार आहे.
ही हायपरसोनिक क्रूज मिसाइल मॅक 6 पेक्षा जास्त गतीने लक्ष्याच्या दिशेने कूच करेल. रशियाचं 3M22 जिरकॉन मिसाइल ब्रह्मोस-II मिसाइलची प्रेरणा आहे. हे स्क्रॅमजेट आधारित हायपरसोनिक मिसाइल आहे. अणवस्त्र डागण्याची याची क्षमता आहे. ब्रह्मोस एयरोस्पेसने दहावर्षापूर्वी ब्रह्मोस-II प्रोजेक्ट तयार केलं होतं. याच्या मार्गात अनेक अडथळे आले. रशिया सुरुवातीला अत्याधुनिक हायपरसोनिक टेक्नोलॉजी शेअर करण्यास इच्छुक नव्हता. शिवाय या मिसाइल निर्मितीचा खर्च सुद्धा जास्त होता.
रशियावर काय बंधनं होती?
वर्ष 2008 मध्ये ब्रह्मोस-II प्रोजेक्टची घोषणा करण्यात आली होती. 2015 पर्यंत पहिल्या चाचणीची अपेक्षा होती. पण प्रोजेक्टमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे विलंब झाला. MTCR चा सदस्य असल्यामुळे रशिया सुरुवातीला 300 किलोमीटरपेक्षा अधिक दीर्घ पल्ल्याची टेक्नेलॉजी शेअर करु शकत नव्हता. पण वर्ष 2014 मध्ये भारत MTCR चा सदस्य बनल्याने ही स्थिती बदलली.
हायपरसोनिक स्पीडने लक्ष्यभेद
जगात Advance हायपरसोनिक शस्त्रांबद्दल वाढती रुची आणि स्पर्धेने या प्रोजेक्टमध्ये नव्याने प्राण फुंकले आहेत. आता दोन्ही देश दोघांच्या रणनितीक हिताच्या दृष्टीने सहकार्य वाढवण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकत आहेत. ब्रह्मोस-II (याला ब्रह्मोस-2 किंवा ब्रह्मोस मार्क-II सुद्धा म्हटलं जातं) मिसाइल टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात एक मोठ पाऊल आहे. याचा स्पीड मॅक 6 ते 8 दरम्यान आहे. याची मारक क्षमता 1500 किमी आहे. हायपरसोनिक स्पीडने हे मिसाइल लक्ष्यभेद करेल.
ब्रह्मोस-2 ची प्रेरणा काय?
याचं डिजाइन रशियाच्या 3M22 जिरकॉनपासून प्रेरित आहे, ज्याची गती मॅक 9 आहे. 3M22 रशियन नौदलाचा भाग आहे. ब्रह्मोस-II मध्ये स्क्रॅमजेट इंजिन असेल. जे सध्याच्या ब्रह्मोस रामजेट सिस्टिमपेक्षा अधिक अत्याधुनिक आहे. ब्रह्मोस-II ज वजन जवळपास 1.33 टन असू शकतं. हे एअर-लॉन्च ब्रह्मोस-A (2.65 टन) पेक्षा निम्म आहे. भारताच्या स्वदेशी लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) तेजसमध्ये सुद्धा हे मिसाइल फिट करण्यात येईल.