
पाकिस्तानातून घुसखोरी करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद संघटनेच्या दोन आत्मघाती हल्लेखोरांचा भारतीय सुरक्षा दलांनी खात्मा केला. त्यानंतर जवळपास पंधरवड्यानंतर नुकतेच जम्मू-काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात बीएसएफला दहशतवाद्यांचा भूमिगत सीमापार बोगदा आढळून आला आहे.

BSF अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या बोगदा 150 मीटर लांब आहे. सीमेपलीकडून घासखोराच्या सातत्याने भारतीय सीमेत घुसण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र आम्ही तो हाणून पडला आहे.

BSFच्या एका टीम कालपासून बोगद्याचा शोध घेण्याचे काम सुरु केले होते. बोगद्याच्या शोधण्याच्या कामामध्ये टीमला या यश मिळाले असल्याची माहिती BSF जम्मूचे आयजी डी.के. बूरा यांनी दिली आहे.

जम्मू-कश्मीरमधील सांबा परिसरात संशयित बोगदा आढळून आल्याने त्या ठिकाणची सुरक्षाया वाढवण्यात आली आहे.

जम्मूच्या सुंजवान भागात 22 एप्रिल रोजी झालेल्या चकमकीनंतर बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर तपासणी मोहीम राबवली होती.

दोन आत्मघाती दहशतवाद्याचा खात्मा केल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) कर्मचाऱ्यांच्या सोबत ही शोध मोहीम राबली होती. .