मधमाशीने गळ्याला डंख मारला तर व्यक्तीचा खरंच मृत्यू होतो का? जसं संजय कपूर यांच्यासोबत घडलं

मधमाशीने गळ्याला डंख मारला तर खरच मृत्यू होऊ शकतो का? संजय कपूर यांच्यासोबत नेमकं काय घडलं होतं? याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

मधमाशीने गळ्याला डंख मारला तर व्यक्तीचा खरंच मृत्यू होतो का? जसं संजय कपूर यांच्यासोबत घडलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 16, 2025 | 3:15 PM

उद्योगपती संजय कपूर यांचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूबद्दल समोर आलेल्या माहितीनुसार लंडनमध्ये पोलो खेळत असताना त्यांच्या तोंडामध्ये मधमाशी गेली, या मधमाशीनं त्यांच्या श्वास नलीकेला डंख मारला असावा असं बोललं जातं, त्यानंतर त्यांना हृदय विकार झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. असाच एक सीन चर्चित ओटीटी सीरीज ब्रिजरटनमध्ये देखील दाखवण्यात आला आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीच्या गळ्याला मधमाशी डंख मारते आणि त्याचा मृत्यू होतो, चला तर मग जाणून घेऊयात जर मधमाशीने गळ्याला डंख मारला तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो का?

संजय कपूर यांचा मृत्यू 12 जूनला लंडनमध्ये झाला. ते 53 वर्षांचे होते. रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चुकून मधमाशी त्यांच्या तोडांत गेली आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मात्र या वृत्ताला अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाहीये. मात्र दुसरीकडे त्यांची कंपनी असलेल्या सोना कॉम्स्टारच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना संजय कपूर यांचा मृत्यू हा हृदय विकाराच्या धक्क्यानेच झाल्याचं सांगितलं आहे.

जर तुम्ही चुकीने जिवंत मधमाशी गिळली तर तुमच्या मृत्यूची शक्यता असते, मात्र अशी प्रकरण दुर्लभ आहेत.जर मधमाशीने तुमच्या श्वास नलिकेला डंख मारला किंवा ती तुमच्या श्वास नलिकेत अडकली तर अशा स्थितीमध्ये परिस्थिती गंभीर होऊ शकते. तुमचा मृत्यू देखील होऊ शकतो.

गळ्याला डखं मारला तर मृत्यू होतो का?

मधमाशीचा डंख हा प्रचंड वेदनादायक असतो. मधमाशी तुमच्या शरीरावर ज्या ठिकाणी डंख मारते तेवढा भाग प्रचंड सूजतो.मात्र त्यामुळे तुमचा मृत्यू होऊ शकत नाही. मात्र जर एकाचवेळी हजारो मधमाशांनी एखाद्या व्यक्तीवर हल्ला केला तर अशा परिस्थितीमध्ये मृत्यूची शक्यता वाढते. तसेच गळ्याला मधमाशीने डंख मारला तर मृत्यूची शक्यता खूपच कमी आहे. मात्र परिस्थिती गंभीर होऊ शकते. ज्या व्यक्तींना मधमाशीच्या विषाची अ‍ॅलर्जी आहे, अशा लोकांना याचा सर्वाधिक धोका असतो. मधमाशीने गळ्याला डंख मारल्यास तुमची श्वासन नलिकेवर देखील सूज येण्याची शक्यता असते.

टीप – वर दिलेल्या माहितीला आमचा कुठल्याही प्रकारचा दुजोरा नाही, ही माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आली आहे.