बिहारमध्ये ईडी, सीबीआयमुळे राजकीय भूकंप; फ्लोअर टेस्टपूर्वी आरजेडी नेत्यांवर छापेमारी; झारखंडमध्येही कारवाई सुरू

| Updated on: Aug 24, 2022 | 10:13 AM

केंद्रीय तपास यंत्रणेच्या सीबीआय आणि ईडीकडून आता बिहार आणि झारखंडमध्ये छापेमारी सुरू झाली आहे. नोकरीच्या बदल्यात जमीन या प्रकरणात सीबीआयने पाटणा येथील आरजेडी आमदार सुनील सिंह यांच्यावर छापा टाकला आहे. याबरोबरच बेकायदेशीर खाणकाम आणि खंडणीप्रकरणी झारखंडमधील रांची येथेही छापे टाकण्यात आले असून प्रेम प्रकाश यांच्या संबंधित या ठिकाणांवर हे छापे टाकले गेले आहेत.

बिहारमध्ये ईडी, सीबीआयमुळे राजकीय भूकंप; फ्लोअर टेस्टपूर्वी आरजेडी नेत्यांवर छापेमारी; झारखंडमध्येही कारवाई सुरू
Follow us on

नवी दिल्लीः केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय (CBI) आणि ईडीकडून (ED) आता बिहार आणि झारखंडमध्ये छापे टाकण्यात आले आहेत.सीबीआयने जमीन देवाण-घेवाण प्रकरणी पाटणा येथील आरजेडी आमदार सुनील सिंह (Bihar RJD MLA Sunil Singh) आणि राज्यसभा खासदार अशफाक करीम यांच्यावरही छापेमारी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. बिहारमधील आरजेडी नेत्याची बुधवारी विधानसभेत फ्लोअर टेस्ट होत असतानाच सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे. सीबीआय आणि ईडीच्या छापेमारीविषयी आरजेडी आमदार सुनील सिंह यांनी सांगतले की, सीबीआय आणि ईडीकडून हा असा जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आरजेडीचे आमदार आपल्या सोबत येतील या भीतीने तपास यंत्रणांचा वापर केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

ईडीकडून झारखंड, तामिळनाडू, बिहार आणि दिल्लीतील 17 ठिकाणी छापे टाकले आहेत. अवैध खाणकाम आणि खंडणी प्रकरणी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

झारखंडमध्येही छापेमारी सुरू

प्रेम प्रकाश यांच्याशी संबंधित ठिकाणांवर हे छापे टाकले जात आहेत. प्रेम प्रकाश यांचे अनेक राजकीय नेत्यांबरोबर त्यांचे जवळचे संबंध आहेत. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे आमदार प्रतिनिधी पंकज मिश्रा यांची चौकशी करुन त्यांच्यावरही छापा टाकण्यात आला आहे.

लालू प्रसाद यादवांचा भरती घोटाळा?

लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना नोकरी देण्याच्या बदल्यात जमीन आणि भूखंड घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या तपासानंतर सीबीआयने लालू प्रसाद यादव, राबडी देवी, मिसा यादव, हेमा यादव आणि काही संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ज्यांना भूखंड किंवा मालमत्तेच्या बदल्यात नोकरी देण्यात आली होती. यापूर्वी मे महिन्यात सीबीआयकडून याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित 17 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. सीबीआयची ही कारवाई तब्बल 14 तास चालली होती. त्यावेळी लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी आणि मुलगी मिसा भारती यांच्या पाटणा, गोपालगंज आणि दिल्लीतील घरांवरही छापा टाकण्यात आला होता.

भोला यादवला अटक

या प्रकरणी जुलै महिन्यात सीबीआयकडून मोठी कारवाई करण्यात आली होती, त्यामध्ये लालू प्रसाद यादव यांचे माजी ओएसडी भोला यादव यांनाही अटक करण्यात आली होती. यादरम्यान सीबीआयने बिहारमधील पाटणा आणि दरभंगा येथील चार ठिकाणी छापे टाकून त्यांच्यावर कारवाई केली होती. भोला यादव 2004 ते 2009 या काळात लालू प्रसाद यादव यांचे ओएसडी होते. लालू प्रसाद यादव त्यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांच्यावेळी मोठा रेल्वे भरती घोटाळा झाला होता. भोला यादव हा या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोपही करण्यात आला होता.