जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला नेमका अपघात कसा झाला? इमर्जन्सी कॉलही का केला नाही? नवी माहिती समोर

| Updated on: Dec 09, 2021 | 1:28 PM

इम्बतूर एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरच्या पायलटनं घटना घडण्यापूर्वी दिला जाणारा मेडे कॉल (May Day) केला नव्हता.

जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला नेमका अपघात कसा झाला? इमर्जन्सी कॉलही का केला नाही? नवी माहिती समोर
हेलिकॉप्टर क्रॅश
Follow us on

No MayDay Call Before Crash नवी दिल्ली : देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत (Bipin Rawat) यांचं तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) निलगिरी जिल्ह्यातीलू कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेत (IAF Helicopter Crash) निधन झालं आहे. हेलिकॉप्टरमधील 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे. केंद्र सरकारनं बुधवारी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर फॉरेन्सिकच्या टीमनं गुरुवारी म्हणजेच आज घटनास्थळी जाऊन पाहणी करुन ब्लॅक बॉक्ससह आवश्यक गोष्टी गोळा केल्या. तर, कोइम्बतूर एटीएसनं दिलेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरच्या पायलटनं घटना घडण्यापूर्वी दिला जाणारा मेडे कॉल (MayDay) केला नव्हता. ज्यावेळी विमान किंवा हेलिकॉप्टरच्या उड्डाणादरम्यान कोणतीही अडचण निर्माण झाल्यास, किंवा ते क्रॅश होणार असल्याच समोर आल्यास पायलट शेवटचा कॉल मेडे म्हणजेच इमर्जन्सी कॉल करतात त्याला मेडे कॉल म्हणतात.

मेडे कॉल आला नाही

माध्यमातील रिपोर्टनुसार, वेलिंग्टन बेस उतरण्यापूर्वी पाच मिनट हेलिकॉप्टरचा कंट्रोल डिफेन्स एटीसीकडे जाण्यापूर्वी एमआय-17 वी5 च्यापायलटनं कोइम्बतूरच्या एटीसीला शेवटचा संदेश पाठवला होता. त्या संदेशात डेस्टिनेशन कंट्रोलच्या संपर्कात असल्यांच सांगितलं होतं. हेलिकॉप्टर क्रॅश होण्यापूर्वी 4 हजार फुटावर काहीतरी बदल झाले होते. कोईम्बतूर एटीसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोणताही मेडे कॉल म्हणजे आपत्कालीन कॉल करण्यात आला नव्हता.

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनसुार आपत्कालीन विशेष प्रकरणांमध्येचं मेडे कॉल केला जातो. अधिकाऱ्यानं सांगितलं की प्रवाशांना उतरवून 10 मिनिटांमध्येच परत यायचं होतं. हेलिकॉप्टरच्या हालचाली रडारवर ट्रॅक करण्यात आल्या नव्हत्या. कोईम्बतूरमध्ये कमी उंचीवरील उड्डाणांना मॅप करण्याची व्यवस्था उपलब्ध नव्हती. कुन्नूर जवळील एमआय 17 हेलिकॉप्टरच्या दुर्घटनाग्रस्त होण्याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मेडे कॉल काय असतो?

पायलटला ज्यावेळी अपघाताची शंका असते त्यावेळी केल्या जाणाऱ्या आपत्कालीन कॉलला मेडे म्हणटलं जातं. ही व्यवस्था विमान आणि हेलिकॉप्टरमध्ये उपलब्ध असते. तीन वेळा मेडे म्हटलं जातं. फोन कॉल ऐकणाऱ्याचा गैरसमज होऊ नये म्हणून तीन वेळा शब्द बोलल जातं.

दरम्यान, बिपीन रावत यांचं पार्थिव आज दिल्लीला (Delhi) आणलं जाणार आहे. बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचं पार्थिव आज सायंकाळपर्यंत दिल्ली येथे आणलं जाणार आहे.

इतर बातम्या:

Army Chopper Crash: हेलिकॉप्टर दुर्घटनेपूर्वी नक्की काय घडलं?, काही सेकंदाचा व्हिडीओसमोर, ब्लॅक बॉक्सही सापडला

Video :अपघातातून बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांची प्रकृती कशी आहे? राजनाथ सिंगांची सभागृहाला माहिती

CDS General Bipin Rawat Helicopter crash no mayday info by Coimbatore ATC said Sources