Army Chopper Crash: हेलिकॉप्टर दुर्घटनेपूर्वी नक्की काय घडलं?, काही सेकंदाचा व्हिडीओसमोर, ब्लॅक बॉक्सही सापडला

तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील व्हिडीओ समोर आला आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ असून त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत.

Army Chopper Crash: हेलिकॉप्टर दुर्घटनेपूर्वी नक्की काय घडलं?, काही सेकंदाचा व्हिडीओसमोर, ब्लॅक बॉक्सही सापडला
IAF chopper Crash

नवी दिल्ली: तामिळनाडूच्या कुन्नूर येथे झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेतील व्हिडीओ समोर आला आहे. काही सेकंदाचा हा व्हिडीओ असून त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत. मात्र, या व्हिडीओच्या सत्यतेबाबत कुणीही दुजोरा दिलेला नाही. शिवाय हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्सही सापडला आहे. त्यामुळे अपघाताची नेमकी कारणं स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.

तामिळनाडूच्या कुन्नूर जिल्ह्यातील निलगीरीच्या डोंगरात लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सीडीएस बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 13 जणांचा मृत्यू झाला. या घटनेच्या आधीचा एक व्हिडीओ न्यूज एजन्सी ANIने व्हिडीओ जारी केला आहे. सीडीएस बिपीन रावत ज्या Mi-17 हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्याच हेलिकॉप्टरचा हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जात आहे. एका पर्यटकाने हा व्हिडीओ बनविल्याचं सांगितलं जात आहे. हे हेलिकॉप्टर घनघोर धुक्यातून जात असल्याचं दिसत आहे.

फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी

दरन्यान, संचालक श्रीनिवासन यांच्या नेतृत्वातील तामिळनाडूच्या फॉरेन्सिक सायन्स डिपार्टमेंटची एक टीम कुन्नूरला कॅटरीजवळ गेली आहे. त्या ठिकाणी हवाई दलाने हेलिकॉप्टरचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे. अपघाताच्या शेवटच्या क्षणी नेमके काय झाले होते हे या ब्लॅक बॉक्समधून स्पष्ट होणार आहे.

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?

ब्लॅक बॉक्स हा कोणत्याही विमान किंवा हेलिकॉप्टरचा महत्त्वाचा भाग असतो. हेलिकॉप्टर किंवा प्लेनच्या उड्डाणापूर्वीच्या हालचाली या ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केल्या जातात. पायलट आणि एटीसीचं संभाषणही ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड केलं जातं. या शिवाय पायलट आणि को-पायलटचं संभाषणही यात रेकॉर्ड केलं जातं. या ब्लॅक बॉक्सला डेटा रेकॉर्डरही म्हटलं जातं.

कसा झाला अपघात?

दरम्यान, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेत या अपघाताची माहिती दिली. कुन्नूर एअर बेसवरून हेलिकॉप्टरने उड्डाण घेतलं. 12 वाजून 15५ मिनिटांने वेलिंग्टन एअरबेसला हेलिकॉप्टरला लँड करायचं होतं. कुन्नुर एअरबेसच्या एअर ट्रफिक कंट्रोलने जवळपास 12 वाजून 8 मिनिटांनी हेलिकॉप्टरशी आपला संपर्क तुटला. त्यानंतर कुन्नूर जवळ काही स्थानिक लोकांना आग लागल्याचं दिसलं. त्यावेळी पळतच स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा मिलिट्री हेलिकॉप्टरचे अवशेषांना आग लागलेली त्यांनी पाहिली, असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं.

या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. हेलिकॉप्टरच्या अवशेषातून जेवढ्या लोकांना काढणं शक्य होतं, तेवढ्यांना तात्काळ बाहेर काढून वेलिंग्टनच्या रुग्णालयात नेलं. मिळालेल्या माहितीनुसार त्या हेलिकॉप्टरमधील 14 पैकी 13 लोकांचा मृत्यू झाला. ज्यांची मृत्यू झाला त्यात सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत यांचा समावेश होता. शिवाय त्यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर लखवीनदर सिंग लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरविंद सिंग आणि एअर फोर्स हेलिकॉप्टर क्रूसहीत आर्म्सफोर्सचे अन्य नऊ लोकांचा मृत्यू झाला. त्यात विंग कमांडर पृथ्वीसिंग चौहान, स्क्वॉन्ड्रन लिडर कुलदीप सिंग, राणा प्रताप दास, अरकल प्रदीप, हरविंदर सतपाल राय, नायक गुरुसेवक सिंग, नायक जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, बी साई तेजा आदींचा समावेश होता, अशी माहिती त्यांनी दिली.

संबंधित बातम्या:

VIDEO | हा तोच जनरल रावतांच्या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचा Video आहे? ढगात शिरताना शेवटी काय दिसतंय?

Bipin Rawat : रावत यांच्याबरोबर अनेक रहस्य संपली, हेलिकॉप्टर अपघाताने सर्वोच्च नेतृत्वही गोंधळलं: संजय राऊत

Bipin Rawat : बिपीन रावत यांच्याकडून छत्रपती ताराराणींच्या इतिहासाची आपुलकीनं विचारणा, संभाजी छत्रपतींनी जागवल्या आठवणी

Published On - 12:54 pm, Thu, 9 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI