मोठी बातमी! विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला मोठा ब्रेक, सरकारने दिले निर्देश, आता..

देशातील विमानसेवा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे बघायला मिळत आहे. इंडिगोची सेवा पूर्णपणे विस्कळीत आहे. याचा फटका गेल्या चार दिवसांपासून प्रवाशांना बसतोय. आजही इंडिगोची विमानसेवा ठप्प आहे. त्यामध्येच आता सरकारने मोठा निर्णय घेतला.

मोठी बातमी! विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला मोठा ब्रेक, सरकारने दिले निर्देश, आता..
Airline
| Updated on: Dec 06, 2025 | 1:51 PM

इंडिगोकडून मागील चार दिवसांपासून विमान उड्डाणे रद्द केली जात आहेत. आज पाचवा दिवस असून अजूनही इंडिगोची सेवा सुरळीत झाली नाही. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्याने मोठा हा:हाकार देशात माजला. विमानतळावर मोठी गर्दी बघायला मिळत आहे. प्रवाशांचा संताप सुरू असून दुसऱ्या विमान कंपन्यांनी तिकिट दरांमध्ये मोठी वाढ केली. हेच नाही तर देशातंर्गत प्रवास करण्यासाठी आता लाखो रूपये मोजावी लागत आहेत. दुसऱ्या विमान कंपन्यांनी वाढवलेल्या तिकीट दरामुळे प्रवासी अडचणीत सापडले आहेत. इंडिगोवर कारवाई सरकारने करावी, अशी मागणी केली जात आहे. यादरम्यानच आता सरकारने अत्यंत मोठा आदेश विमान कंपन्यांना दिला आहे.

परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, गृहमंत्री अमित शहा यांना हस्तक्षेप करून नागरी उड्डाण मंत्रालयाशी बोलावे लागले. त्यामध्येच सरकारने दिलेल्या आदेशानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून विमान कंपन्यांची मनमानी थांबवण्यासाठी कठोर कारवाई केली आहे. विमान भाडेवाढीवर स्थगिती देण्यात आली. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने सर्व विमान कंपन्यांना निर्देश जारी केले आहेत.

सरकारच्या या निर्देशानंतर विमान कंपन्यांची मनमानी थांबणार असल्याचे स्पष्ट आहे. सरकारने सांगितले आहे, भाडे निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त नसावे. इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यानंतर दुसऱ्या विमान कंपन्यांनी संधीचा चुकीचा फायदा घेतला आणि स्वत: वाटतील तशी भाडेवाढ केली. एका तिकिटावर त्यांनी तब्बल पंधरा ते वीस हजार वाढ केली. साधारणपणे अगोदर मिळणारे 10 हजाराचे तिकिट आता 50 हजारांना विकले जातंय.

प्रवाशी इंडिगोच्या विस्कळीत विमान सेवेमुळे अनेक ठिकाणी अडकले आहेत. महागडी तिकिटे खरेदी करूनही प्रवासी आपल्या इच्छित स्थळी पोहोचत आहेत. मात्र, वाढलेल्या तिकिट दरामुळे लोकांमध्ये मोठे संतापाचे वातावरण बघायला मिळाले. शेवटी सरकारने यामध्ये मध्यस्थी करत विमान कंपन्यांना मोठे निर्देश दिले असून कारवाई करण्याचेही संकेत दिली आहेत. यामुळे विमान कंपन्यांच्या मनमानी कारभाराला कुठेतरी ब्रेक लागणार आहे.