केंद्र सरकारचा मोठा निर्णय, थेट सोने खरेदीबाबत काढला मोठा आदेश, आयात शुल्कात थेट..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 1 वर्षांकरिता सोने खरेदी करू नका, असे आवाहन केले. सलग दोनदा त्यांनी यावर भाष्य केले. यादरम्यानच आता सरकारकडून अत्यंत मोठा निर्णय घेत आदेश जारी करण्यात आला. ज्याने मोठी खळबळ उडालीये.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 तासात दोनदा आपल्या भाषणात जनतेला 1 वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे मोठे आवाहन केले. नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर एकच खळबळ उडाली. भारत हा जगातील नंबर दोनचा देश आहे, जो सर्वात जास्त सोने आयात करतो. मात्र, इराण आणि अमेरिका युद्धात परकिया चलन वाचवणे महत्वाचे आहे. परकिय चलनावरील दबाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला 1 वर्षाकरिता सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर आता केंद्र सरकारकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला. याबाबतचा आदेश आज 13 मे 2026 रोजी काढण्यात आला. सरकारने सोने, चांदी आणि इतर मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवण्याबद्दल अत्यंत मोठा निर्णय घेतला. कोणत्याही पद्धतीने सोने खरेदी सरकारला टाळायची आहे. त्याकरिता हे मोठे पाऊस उचलण्यात आले. आयात शुल्कात थेट मोठी वाढ करण्यात आली. या वाढीव किमती आज रात्रीपासून लागू होणार आहेत.
आज 13 मे 2026 रोजी जारी केलेल्या केंद्र शासनाच्या आदेशानुसार, भारताने सोने यासोबतच चांदीवरील आयात शुल्क 6 टक्क्यांहून थेट 15 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. ही अत्यंत मोठी वाढ म्हणावी लागणार आहे. 6 वरून थेट 15 टक्क्यांपर्यंत वाढ केल्याने मोठी खळबळ उडाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारला सोने खरेदी रोखायची आहे. त्यामुळे अशाप्रकारची पाऊले उचलली आहेत.
या धातूंची परदेशी खरेदी रोखणे आणि देशाच्या परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करणे हा मोठा प्रयत्न सरकारचा आहे. सरकारच्या आयात शुल्कवाढीमुळे भारतातील सोन्याची होणारी आयात कमी होऊ शकते, असा अंदाज आहे. आशियातील सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चलनांपैकी एक असलेल्या रुपयाला यामुळे मदत होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन आणि त्यानंतर थेट 15 टक्के आयात शुल्कात वाढ. यामुळे सोने खरेदीवर थेटपणे परिणाम होण्याचे संकेत आहेत. यासोबतच जर यातूनही मार्ग निघू शकला नाही तर आगामी काळात सरकार अजून काही कडक पाऊले उचू शकते, असा अंदाज आहे. यासोबतच विदेश यात्रा टाळण्याचेही आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशवासियांना केले आहे.