AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : सोने स्वस्त, दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे भाव, थेट..

Todays Gold Rate : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला मोठे आवाहन करत पुढील 1 वर्ष सोने खरेदी करू नये, असे सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनानंतर सोन्याचे भाव घसरत आहेत. आजही सोने स्वस्त झाले आहे.

Todays Gold Rate : सोने स्वस्त, दुसऱ्या दिवशीही सोन्याच्या भावात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे भाव, थेट..
Todays Gold Rate
| Updated on: May 12, 2026 | 9:59 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात जग तणावात आहे. जागतिक बाजारपेठ अस्थिर झाली. इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याचे भाव घसरताना दिसले. ज्यादिवशी इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केला त्यावेळेपासून सोन्याच्या भावात सतत चढउतार दिसत आहे. सोन्याचे भाव सतत घसरत आहेत. सोन्याचे भाव कमी झाल्याने अनेकांनी सोने खरेदी करण्यावर भर दिला. भारतात सोन्याचे मोठे मार्केट आहे. मात्र, दोन दिवसांमध्ये तब्बल दोनदा भारतीय लोकांना 1 वर्षाकरिता सोने खरेदी करू नका, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले. नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन लोकांना केल्यापासून सतत सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. नुकताच आजचे सोन्याचे दर पुढे आली आहेत.

12 मे 2026 रोजी सोन्याच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. कालपेक्षा आज सोने अधिक स्वस्त झाले आहे. मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,52,129 रूपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,440 आहे. 18 कॅरेट सोन्याचा भाव 1,14,90 रूपये आहे. कालच्या तुलनेत आज सोने स्वस्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन केल्यानंतर सोने स्वस्त होताना दिसत आहे.

दिल्ली, कोलकता, चेन्नई, हैद्राबाद या शहरांमध्ये सोन्याच्या भावात घसरण नोंद झाली. दिल्ली येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,52,270 रूपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,39,590 रूपये आहे. चेन्नई येथे 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,53,810 रूपये आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,40,990 आहे. दोन दिवसांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचे बघायला मिळत आहे.

परकीय चलनात तुटवडा होऊ नये, यासोबतच व्यापारात तुटवडा टाळण्याकरिता नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन लोकांना केल्याचे सांगितले जात आहे. 1 वर्षाकरिता सोने खरेदी न करण्याच्या आवाहनामागे अनेक कारणे आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात रूपयावर मोठा परिणाम होत आहे. फक्त सोने खरेदी न करणेच नाही तर यासोबतच विदेश यात्रा टाळण्याचेही आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले. पुढील काही दिवसात सोन्याचे भाव अधिक घसरण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?