AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर, तब्बल इतक्या..

Jalgaon Sarafa Market : सोन्याच्या भावात मोठी घसरण झालीये. गेल्या काही दिवसांपासून सतत सोने आणि चांदीच्या भावात चढउतार बघायला मिळत आहे. त्यामध्येच आता सोने आणि चांदीचे भाव घसरले आहेत.

Todays Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचे नवे दर, तब्बल इतक्या..
Gold Price
| Updated on: May 11, 2026 | 1:42 PM
Share

इराण आणि अमेरिका युद्धात सोन्याच्या दरात सतत चढउतार बघायला मिळत आहे. 28 फेब्रुवारीपूर्वी सोन्याचे दर गगणाला पोहोचले होते. मात्र, जसाही इराणवर अमेरिकेने हल्ला केला तसे सोन्याचे दर कोसळले. उच्चांकापेक्षा सोने खालीच आहे. सोन्याचे दर कमी झाल्याने अनेक लोकांनी सोने खरेदीकडे कल वळवला. मात्र, नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी 1 वर्षासाठी करू नका, असे आवाहन नागरिकांना केले. नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदी न करण्याचे आवाहन करताच त्याचे पडसाद सराफा व्यापारात बघायला मिळाले. हेच नाही तर सोन्याच्या दरात घसरण देखील झाली. सोन्यासोबतच चांदीचेही भाव घसरले आहेत. परकिय चलन वाचवण्याकरिता हे आवाहन करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्धात जग संकटात असतानाही भारतात सोन्याची मोठी खरेदी होत आहे. त्याचा परिणाम परकिय चलनावर होत आहे. आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली.

सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. सोन्याचा 24 कॅरेटचा दर जीएसटीसह 1 लाख 54 हजार 500 रुपये आहे तर चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 66 हजार 770 रुपयांवर आहे. कालच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली. भारत हे सोन्याची अत्यंत मोठी बाजारपेठ आहे. भारतात विदेशातून सोने आयात केले जाते.

कोणताही कार्यक्रम असो सोन्याची देवाण-घेवाण होते म्हणजे होतेच. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना मोठे आवाहन करत सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांच्या या आवाहनानंतर सोन्याच्या दरात 800 रुपयांनी घसरण झाली. पुढील काही दिवसात सोन्याचे दर आणखीन घसरण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

युद्धादरम्यान सोन्याचे दर घसरत आहेत. मात्र, यादरम्यानच भारतात सोन्याची मागणी चांगलीच वाढल्याचे बघायला मिळत आहे. मात्र, यामुळे व्यापारात तुट निर्माण होत आहे. इराण आणि अमेरिका युद्ध थांबल्यानंतर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या भावात वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. सोन्याचा भाव 2 लाखाच्या आसपास गेला होता.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?