
नवी दिल्ली | 14 मार्च 2024 : सोशल मीडिया आणि ओटीटी असा प्लॅटफॉर्म आहे, ज्यावरुन तुम्ही घरबसल्या जे हवं ते पाहू शकता. पण या प्लॅटफॉर्मचा चुकीचा वापर करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाहीय. अशा अनेक वेबसाइट्स, ओटीटी प्लेटफॉर्म आणि APPS आहेत, जे अश्लील कंटेंट लोकांपर्यंत पोहोचवतात. या प्रकरणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एक मोठ पाऊल उचललय. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने कारवाई करताना 18 ओटीटी प्लॅटफॉर्म, 19 वेबसाइट आणि 10 APP वर बंदी घातलीय.
इतकच नाही, 57 सोशल मीडिया हँडलही ब्लॉक केले आहेत. भारत सरकारच्या मते या सर्व साइट्स आणि ओटीटी प्लेटफॉर्मसनी आयटी कायद्याच उल्लंघन केलय. त्याशिवाय ऑनलाइन प्लेटफॉर्म इंडियन पीनल कोडच सुद्धा उल्लंघन सुरु होतं. मागच्या अनेक वर्षांपासून ओटीटी प्लॅटफार्म आणि वेबसाइटसकडून महिलांची इमेज खराब करण्याच काम सुरु होतं. 12 मार्च 2024 रोजी केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी ही घोषणा केली.
युजर किती लाख?
जे हँडल ब्लॉक आणि बॅन केलेत, त्यात काहींचे एक कोटी तर काहींचे 15 लाख यूजर होते. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कायदे तज्ज्ञ आणि एक्सपर्ट कमेटीसोबत डिस्कस केल्यानंतर हा निर्णय घेतलाय. एएनआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर सुद्धा एक यादी शेअर केलीय.
Ministry of I&B blocks 18 OTT platforms for obscene and vulgar content after multiple warnings; 19 websites, 10 apps, 57 social media handles of OTT platforms blocked nationwide, says the government. pic.twitter.com/03ojj3YEiF
— ANI (@ANI) March 14, 2024
शेयर केलेल्या लिस्टमध्ये ते सर्व ओटीटी प्लॅटफर्म, ऐप, वेबसाइट्सची नाव आहेत. भारत सरकारच्या सूचना प्रसारण मंत्रालयने बॅन आणि ब्लॉक केलय. सरकारच्या मते, अश्लील कंटेंटचा युवकांवर वाईट परिणाम होतो.