AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तर 30 दिवसात खुर्ची रिकामी करावी लागणार, राजकारणात खळबळ उडवून देणारा नवा कायदा येणार? मास्टर प्लॅन काय?

३० दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहिल्यास मंत्र्यांना पायउतार व्हावे लागेल, अशा नव्या कायद्याची केंद्र सरकार तयारी करत आहे. संयुक्त संसदीय समिती (JPC) यावर अभ्यास करत असून, उज्ज्वल निकम यांनी याला ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे.

तर 30 दिवसात खुर्ची रिकामी करावी लागणार, राजकारणात खळबळ उडवून देणारा नवा कायदा येणार? मास्टर प्लॅन काय?
PM Narendra Modi
| Updated on: May 15, 2026 | 7:40 AM
Share

देशाच्या राजकीय आणि संवैधानिक इतिहासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारने सुरू केल्या आहेत. पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्री जर ३० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिले, तर त्यांना आपल्या पदावरून पायउतार व्हावे लागेल, अशा आशयाचा नवा कायदा केंद्र सरकार आणणार असल्याचे बोललं जात आहे. राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्जवल निकम यांनी या प्रस्तावित कायद्याचे स्वागत केले आहे. भारतीय लोकशाहीतील एक क्रांतिकारक पाऊल असे अॅड. उज्ज्वल निकम यांनी म्हटले आहे.

नवा प्रस्तावित कायदा काय आहे?

सध्याच्या कायदेशीर तरतुदींनुसार, जोपर्यंत एखाद्या लोकप्रतिनिधीला न्यायालयाने दोषी ठरवून किमान दोन वर्षांची शिक्षा सुनावली जात नाही, तोपर्यंत त्याचे पद जात नाही. मात्र, प्रस्तावित नव्या कायद्यानुसार, जर एखादा पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना गंभीर गुन्ह्याखाली अटक झाली आणि त्याला सलग ३० दिवस जामीन मिळाला नाही, तर त्याला पदावर राहता येणार नाही. या ३० दिवसांची मुदत संपताच संबंधित व्यक्तीला पदावरून दूर करण्याची तरतूद या कायद्यात असेल. यामुळे तुरुंगातून सरकार चालवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

संयुक्त संसदीय समिती (JPC) करणार अभ्यास

या कायद्याचे महत्त्व आणि त्यातील तांत्रिक बाबी लक्षात घेऊन, यात कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकारने संयुक्त संसदीय समिती (JPC) नियुक्त केली आहे. ॲड. उज्वल निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कायद्याचा मसुदा अत्यंत बारकाईने तपासला जात आहे, जेणेकरून भविष्यात याचा गैरवापर होणार नाही. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकार सर्व राज्यांच्या संपर्कात आहे. विशेषतः महाराष्ट्र, ओडिशा आणि दिल्ली येथील मुख्य सचिव आणि कायदा सचिवांना पाचारण करून यावर सविस्तर चर्चा करण्यात येत आहे. प्रत्येक राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांच्याशी समन्वय साधून या कायद्याला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

नैतिकतेचा नवा पायंडा

ॲड. उज्वल निकम यांच्या मते, हा कायदा केवळ कायदेशीर बदल नसून तो राजकीय नैतिकतेचा एक नवा वस्तूपाठ असेल. लोकशाहीत पारदर्शकता आणि सुशासन महत्त्वाचे असते. एखादी व्यक्ती दीर्घकाळ कोठडीत असताना घटनात्मक पद भूषवणे हे तत्त्वांना धरून नाही, असे ते म्हणाले. आता हा कायदा नेमका कधीपासून लागू होईल, याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. संसदेच्या आगामी अधिवेशनात यासंदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Follow Us
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल