नसीरुद्दीन शाह लोकशाहीसाठी धोकादायक माणूस, केंद्रीय मंत्र्याचं वक्तव्य

Naseeruddin Shah: केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की त्यांना नसीरुद्दीन शाह हे अभिनेता म्हणून आवडतात. पण त्यांचे खरे स्वरूप आता समोर आल्याचा टोला रिजिजू यांनी लगावला. अशा वक्तव्यांमुळे देशातील लोक दोन गटात विभागल्याचे सीपीएमने पलटवार केला आहे.

नसीरुद्दीन शाह लोकशाहीसाठी धोकादायक माणूस, केंद्रीय मंत्र्याचं वक्तव्य
नसीरुद्दीन शाह लोकशाहीसाठी धोकादायक माणूस, केंद्रीय मंत्र्याचं वक्तव्य
| Updated on: Oct 30, 2026 | 8:22 AM

Kiren Rijiju on Naseeruddin Shah: अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी स्वतःला बौद्धिक नक्षलवादी, दिमागी नक्षली म्हटले आहे, त्यांच्या या वक्तव्याची चर्चाच नाही तर पडसाद उमटले. केंद्रीय अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री किरेन रिजीजू यांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला. एक अभिनेता म्हणून आपण नसीरुद्दीन शाह यांचे कौतुक करतो, ते आवडतात. पण आता त्यांचे खरे स्वरूप समोर आले आहे. अशा वक्तव्यांमुळे देशात दोन गट तट निर्माण होत असल्याचा पलटवार रिजिजू यांच्या वक्तव्यानंतर सीपीएमने केला आहे.

त्यांचे खरे रूप समोर आले

Loading...

किरेन रिजीजू म्हणाले की, “मला वाटते की नसीरुद्दीन शाह हे एक सामान्य अभिनेता आहे. ते एक चांगले आणि वाईट अभिनय करणारे नट वाटत होते. मी त्यांना नेहमी कलाकार म्हणूनच पाहिले. मी त्यांचा आदर करतो आणि ते मला आवडायचेही. पण त्यांची मानसिकता एका बौद्धिक नक्षलवाद्याची असेल याची मला कल्पना नव्हती.” त्यांच्या या ट्विटनंतर सीपीएमने रिजिजू यांच्यावर हल्लाबोल चढवला. सीपीएमचे हन्नान मोल्लाह यांनी किरेन रिजिजू यांना मेंटल क्रिमिनल म्हटले. अशा विचारांमुळे देश दोन गटात विभागल्याचे आरोप मोल्लाह यांनी केला.

रिजिजू यांच्यावर CPM चा हल्लाबोल

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखताती हन्नान मोल्लाह यांनी रिजिजू यांच्या टिप्पणीवर जोरदार हल्लाबोल केला. भारताचा स्वातंत्र्य संग्राम, लोकशाही, राज्य घटना आणि मूलभूत अधिकारांची त्यांना माहिती नसल्याचा दावा त्यांनी केला. किरेन रिजिजू हे त्यांच्याच विचारात असतात. त्यांना भारतीय स्वातंत्र्य, लोकशाही आणि राज्य घटनेची काहीच माहिती नाही. नसीरुद्दीन शाह हे एक प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख असलेले अभिनेता आहेत. जर त्यांनी Gen Z आंदोलकांना पाठिंबा दिला असेल तर त्यांचे म्हणणे ही ऐकून घेणे क्रमप्राप्त आहे. ते न करता भाजप आणि रिजिजू हे त्यांच्यावर वैयक्तिक आरोप करत आहेत. हे चुकीचे असल्याचे मोल्लाह म्हणाले.

जे लोक सरकारला सवाल विचारतात. त्यांच्या चुका दाखवून देतात. त्यांना सरकार ब्रेनवॉश्ड नक्षलवादी म्हणतात. जे लोक त्यांचे एजंट,चाटुगिरी आणि खुशामत करतात आणि अंधभक्त आहेत, ते मानसिकरित्या आजारी आहेत. ते मेंटल क्रिमिनल आहे. आज या लोकांनी देशाला दोन गटात विभागले. नसीरुद्दीन शाह यांना जर ब्रेनवॉश्ड नक्षलवादी म्हटले जात असेल तर मग किरेन रिजिजू हे मेंटल क्रिमिनल आहेत, असा पटलवार मोल्लाह यांनी केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us