प्रवासात आता कुबुट वास येणार नाही, रेल्वेचा अत्याधुनिक बोरोस्कोपिक कॅमेरा मेलेला उंदीर शोधणार

रेल्वेत पॅण्ट्री कारमध्ये एकदा उंदीर मामांचा बिनधास्त पाहुणचार सुरु असल्याचा एक व्हिडीओ मागे व्हायरल झाला होता. उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी आता रेल्वेने कंबर कसली आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच मेलेले उंदीर ठेवण्यासाठी रेल्वे आधुनिक उपाय योजले आहेत.

प्रवासात आता कुबुट वास येणार नाही, रेल्वेचा अत्याधुनिक बोरोस्कोपिक कॅमेरा मेलेला उंदीर शोधणार
Borescope camera capture rat in train
| Updated on: Jul 28, 2024 | 10:42 PM

भारतीय रेल्वेचे जाळे जगात चौथ्या क्रमांकाचे आहे. भारतात तर रेल्वेने दररोज अडीच कोटी प्रवासी दररोज प्रवास करतात. परंतू उंदराचा प्रादुर्भाव रेल्वेच्या गाड्यांमध्ये नेहमीच होत असतो. रेल्वेने अशा उंदरांचा नायनाट करण्यासाठी पेस्ट कंट्रोलिंग सुरु केले. परंतू तरीही एक समस्या कायम राहीली ती म्हणजे उंदीर हे विष पेरलेले पदार्थ खाऊन दूर कोपऱ्यात जाऊन मरायचे त्यामुळे यांची दुर्गंधी प्रचंड पसरायची. त्यामुळे रेल्वे प्रवासात नाक मुठीत घेऊन प्रवास करायची वेळ रेल्वे प्रवाशांवर येत असते. परंतू मध्य रेल्वेने आता यावरही उपाय योजला आहे.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकातील रनिंग रूमध्ये मृत उंदरांमुळे मोटरमन आणि इतर कर्मचाऱ्यांना विश्रांती करताना दुर्गंधीचा प्रचंड त्रास होत होता. या मेलेल्या उंदराचा शोध लावण्यासाठी मध्य रेल्वेने अत्याधुनिक उपाय योजला आहे. मध्य रेल्वेने आता आपल्या आस्थापनात बोरोस्कोपिक कॅमरे बसविले आहेत.  मध्य रेल्वेत  कार्यरत रनिंग स्टाफ आणि क्रू कंट्रोल स्टाफ यांना आराम करण्यासाठी रेल्वे तात्पुरती व्यवस्था तयार केली आहे. या ठिकाणी उंदरांचा मोठा प्रादुर्भाव सुरु होता. यावर पेस्ट कंट्रोल करण्यात आले. मात्र हे उंदीर जागोजागी कोपऱ्यात मरु लागले. त्यामुळे त्यांच्या असह्य दुर्गंधीने रेल्वे स्टाफचे आरोग्य धोक्यात आले. त्यासाठी अत्याधुनिक बोरोस्कोपिक कॅमेरा वापरण्याचा निर्णय घेतला. उपनगरीय रनिंग रूम मधून दुर्गंधीची तक्रार येताच मध्य रेल्वेचे हाऊस किपींग स्टाफ तातडीने दाखल होतो. आणि या मेलेल्या उंदराचा पत्ता लावतो. .

मृत उंदरांचा शोध घेणे आणि छडा लावणे

छतावरील पीओपीच्या भागाला स्कॅन करण्यासाटी दोन बोरोस्कोपिक कॅमरे बसविले आहेत. जे मानवी डोळ्यांनी दिसत नाही. ते संपूर्ण क्षेत्राची टप्प्या टप्प्याने स्कॅन केल्यास मृत उंदराचा पत्ता लागतो. त्यानंतर छताच्या पीओपीच्या भागाला तोडून हे मृत उंदीर शोधन काढण्यात यश आले आहे. उपनगरीय लॉबीच्या टॉयलेट आणि वॉशरूमच्या परिसरात तात्पुरत्या छताच्या मागे काही मृत उंदीर आढळून आले.या मृत उंदीरांना ताबडतोब काढून टाकण्यात आले. मृत उंदराचे नमुने आणि पाण्याचे नमुनेही प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

मोटरमनच्या आरामासाठी तात्पुरती व्यवस्था

या क्षेत्रात मोटरमॅन, ट्रेन मॅनेजर आणि चालक दल नियंत्रण कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय लॉबीत मोटरमॅन आणि ट्रेन मॅनेजरना बसण्याची व्यवस्था लॉबीसमोरच्या मोकळ्या जागेत केली होती.  अनेक पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या आहेत.

* मोटरमन गुप्ततेसाठी प्लॅटफॉर्मवर संलग्न क्षेत्र ,

* मोटरमनना त्यांचे सामान ठेवण्यासाठी भांडार रेक,

* मोटरमनसाठी वॉटर डिस्पेंसर

* शेड्यूलनूसार आपल्या लोकल ट्रेनची वाट पहाण्यासाठी मोटरमनला हवा खाण्यासाठी पेडस्टल पंखे ठेवले आहेत

* परेशानी मुक्त साईन ऑन/ऑफ आणि ड्यूटी बँकिंगसाठी मोटरमनसाठी सीएमएस कियोस्क मशीन लावली आहे

* मोटरमनसाठी भोजन व्यवस्थेसाठी प्लॅटफ़ॉर्म क्र. 6 जवळ ग्राउंड फ़्लोअरवर एक तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे

लॉबी क्षेत्रातील सफाई आणि किटकनाशक फवारणी

* कॅटीन सह उपनगरीय लॉबी क्षेत्रात सफाई करण्यात आली

* लॉबीत सर्व एसी मार्गिकांची रोबोटिक सफाई सक्शन मशीनीने केली,तसेच व्हिडियोग्राफीची देखील सुविधा केली

* संपूर्ण ठिकाणांवर किटनाशकांनी स्वच्छ करण्यात आले तसेच कीटाणुमुक्त करण्यात आले