राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार : विहिंप

| Updated on: Dec 23, 2020 | 10:42 AM

समर्पण अभियाना अंतर्गत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील 12 कोटी 25 लाख घरांमध्ये जातील

राम मंदिरासाठी राहुल गांधींकडूनही देणगी घेणार : विहिंप
Follow us on

नवी दिल्ली : अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी सर्वांचा हातभार लागावा, यासाठी विश्व हिंदू परिषदेचे (विहिंप) कार्यकर्ते काँग्रेससह सर्वपक्षीयांकडे जाणार आहेत. काँग्रेसचे दिग्गज नेते राहुल गांधी यांच्याकडून राम मंदिरासाठी देणगी घेण्याचा मानस श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी व्यक्त केला. (Champat Rai says may approach Rahul Gandhi for Ram Mandir Donation)

केसर भवनातील विश्व हिंदू परिषदेच्या क्षेत्रीय कार्यालयात पत्रकारंशी बोलताना राय म्हणाले की 15 जानेवारी 2021 पासून सुरु होणाऱ्या समर्पण अभियाना अंतर्गत विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देशभरातील 5 लाखांपेक्षा अधिक गावं आणि जवळपास 12 कोटी 25 लाख घरांमध्ये जातील.

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते काँग्रेस नेते राहुल गांधींकडेही मदत मागायला जाणार का, असा प्रश्न चंपत राय यांना विचारण्यात आला. आम्ही कार्यकर्त्यांना कोणतीही विशिष्ट मर्यादा घातलेली नाही. आम्ही सर्वांकडे जाणार आणि प्रत्येकाची वेळ घेऊन जाणार, असं राय म्हणाले.

मुस्लीम व्यक्तींकडूनही सन्मानपूर्वक मदत

एखाद्या मुस्लीम समाजातील व्यक्तीने राम मंदिराच्या निर्माण कार्यासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली, तर सन्मानपूर्वक त्यांचीही मदत घेऊ, असं चंपत राय यांनी स्पष्ट केलं. याआधी मुस्लीम धर्मीय व्यक्तीने विश्व हिंदू परिषदेच्या दिल्ली कार्यालयात दोन लाख रुपयांचे चेक जमा केला आहे. आतापर्यंत पाच मुस्लीम व्यक्तींनी मदत केल्याचा अंदाजही राय यांनी व्यक्त केला.

अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भूमिपूजन केले, त्यावेळी पाच ऑगस्टला तीन मुस्लीम नागरिकांना निमंत्रण दिलं होतं, याकडेही चंपत राय यांनी लक्ष वेधलं. हे जगातील सर्वात मोठे जनसंपर्क अभियान असेल, असा दावा राय यांनी केला. यामध्ये सरकारी संसाधनांचा वापर केला जाणार नाही. यात सरकारशी निगडीत व्यक्ती सहभागी होतील, सरकार नाही, असंही राय म्हणाले.

ट्विटरवरुन मदतीसाठी आवाहन

सामनाच्या अग्रलेखात टीका

“अयोध्येतील राम मंदिरासाठी संक्रांतीपासून वर्गणीचे काम सुरु होणार आहे. 14 जानेवारी म्हणजे मकरसंक्रांतीपासून चार लाखांहून अधिक स्वयंसेवक 12 कोटी कुटुंबांशी संपर्क साधतील. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असे विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय यांनी सांगितले. आता या मंदिराच्या निर्माण कार्यासाठी घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्याची ‘टूम’ काढली ती गंमतीची आहे. चार लाख स्वयंसेवक वर्गणीसाठी दारोदार फिरतील. हे स्वयंसेवक नक्की कोण? त्यांना कोणी नेमले आहे?” असे सवाल शिवसेनेने विचारले आहेत.

संबंधित बातम्या :

अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे?, वनवास संपला तरी श्रीरामाची अडवणूक सुरुच, शिवसेनेचा निशाणा

संजय राऊतांची भूमिका राम मंदिर विरोधी, आशिष शेलारांचा हल्लाबोल

(Champat Rai says may approach Rahul Gandhi for Ram Mandir Donation)