Chanakya Niti : चाणक्य म्हणतात या चार ठिकाणी गप्प राहा, आयुष्याचं भलं होईल
चाणक्य निती केवळ मानवी सद्गुणांचे वर्णन करत नाही तर त्यांच्या अनेक दोषांबद्दल देखील सांगते. एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीने कधी बोलावे आणि कधी नाही हे देखील त्यात सांगितले आहे.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या ज्ञान आणि अनुभवावर आधारित एक ग्रंथ रचला, जो आज चाणक्य निती म्हणून ओळखला जातो. या ग्रंथाला ज्ञानाचा महासागर म्हटले जाते. कारण या ग्रंथात चाणक्य यांनी जीवनाच्या विविध पैलुंचे अनेक रहस्य उलगडली आहेत. चाणक्य नीतिमध्ये केवळ मानवी गुणांचे वर्णन केले नाही तर त्यांच्या अनेक दोषांचेही वर्णन केले आहे. एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीने कधी बोलावे आणि कधी नाही हे देखील त्यात नमूद केले आहेत. चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजून घेणारा कोणताही माणूस प्रत्येक अडचणीवर सहज मात करू शकतो, कारण त्याला एखाद्या व्यक्तीचा न्याय करण्याची क्षमता मिळते. त्याचप्रमाणे, चाणक्य नीतिमध्ये असे म्हटले आहे की माणसाने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवले पाहिजे. सगळीकडे बोलणे योग्य नाही. काही ठिकाणी गप्प राहणेच बरे. अशा परिस्थितीत, व्यक्तीने या ठिकाणी गप्प राहावे, अन्यथा त्यांचे काम बिघडू शकते.
मारामारीच्या ठिकाणी
दररोज कुठे ना कुठे मारामारी होतच असते. तेव्हा काही लोकं भांडण्याच्या ठिकाणी न बोलावलेल्या पाहुण्यांप्रमाणे पोहोचतात आणि सल्ला देतात. या लोकांसाठी चाणक्य नीतीमध्ये असे सांगितले आहे की जिथे लोकांमध्ये भांडण होत असेल तिथे शांत राहणे चांगले. कोणीतरी येऊन काही सांगेपर्यंत कोणत्याही वादात बोलू नये. व कोणत्याही अडचणीत पडु नये.
जेथे प्रशंसा होते
अनेकदा काही लोकांना स्वतःची स्तुती करायला आवडते. अशा स्थितीत चाणक्य नीतीमध्ये म्हटले आहे की, स्वतःची स्तुती करणाऱ्या व्यक्तीशी बोलणे योग्य नाही. तेथे गप्प बसणे चांगले. या ठिकाणी तुम्ही काही बोलल्यास तुमचा अपमान होऊ शकतो.
अशा ठिकाणी शांत राहणे चांगले
काही लोकं अशी असतात जी एखाद्या गोष्टीची अर्धवट माहिती घेऊन ज्ञान देण्याचा पर्यंत करतात. पण काही ठिकाणी अशा लोकांची चार माणसंमध्ये फजिती होते. चाणक्य नितीमध्ये म्हटले आहे की, ज्या व्यक्तीला ज्ञान असते ती व्यक्ती शांत स्वभावाची असते. त्यामुळे अर्धवट माहिती घेतलेल्या लोकांनी नेहमी शांत राहवे.
जेव्हा कोणी तुम्हाला समस्या सांगते
चाणक्य नीतीनुसार, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांचे दुःख किंवा समस्या तुमच्यासोबत शेअर करते, तेव्हा तुम्ही त्याचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. अशा वेळी एखाद्या व्यक्तीने मौन बाळगणे चांगले असते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)