छांगूर बाबा दुसऱ्याच्या बायकोला ठेवायचा स्वतःच्याच बायकोसारखं, तिच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती, आकडा पाहून डोळे विस्फारतील!

Chhangur Baba: प्रग्नेंसीमध्ये अडचणी असल्यामुळे महिला छांगूर बाबाकडे आली आणि बाबाने दुसऱ्याच्या बायकोला स्वतःच्या बायकोसारखं ठेवलं... काय आहे आतली माहिती... तिच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती...

छांगूर बाबा दुसऱ्याच्या बायकोला ठेवायचा स्वतःच्याच बायकोसारखं, तिच्या नावावर कोट्यवधींची संपत्ती, आकडा पाहून डोळे विस्फारतील!
फाईल फोटो
| Updated on: Jul 11, 2025 | 1:19 PM

Chhangur Baba: बेकायदेशीर धर्मांतर रॅकेटचा प्रमुख सूत्रधार जमालुद्दीन उर्फ ​​छांगूर बाबा याची जवळची सहकारी नीतू नवीन वोहरा उर्फ ​​नसरीन हिच्याबद्दल नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. नसरीन ही मूळची तामिळनाडू येथील राहणारी आहे. नसरिन पती नवीन व्होरासोबत मुंबईतील छांगूर बाबाच्या संपर्कात आली. तिने बाबाला सांगितले की तिला काही मानसिक समस्या आहेत आणि गरोदरपणातही तिला समस्या येत आहेत. तिच्या सर्व समस्या छांगूर बाबाने सोडवल्या होत्या. त्यामुळे नसरिन छांगूर बाबासोबतच राहू लागली.

असं देखील सांगितलं जातं की, छांगूर बाबाने नसरिन हिला काही औषधं देखील दिली होती. एवढंच नाही तर, बाबाने तिला एक अंगठी देखील दिली. ज्याचा फायदा झाल्यानंतर नसरिन पूर्णपणे छांगूर बाबावर प्रभावित झाली. त्यानंतर नसरीन अनेकदा बाबाला भेटण्यासाठी सुद्धा आली.

त्यानंतर छांगूर बाबाने नवीन व्होरा आणि नीतू नवीन व्होरा यांचं धर्मांतर केलं. नवीन याने स्वतःचं नाव जमालुद्दीन तर नीतू हिने धर्मांतर झाल्यानंतर स्वतःचं नसरीन असं नाव ठेवलं. धर्मांतरानंतर, दोघेही बाबाचे जवळचे आणि विश्वासू बनले. बलरामपूरमधील हवेली देखील नसरीनच्या नावावर होती.

वास्तव असं होतं की, नवीन गाडी चालवायचा आणि नसरीन आणि बाबा मागच्या सीटवर बसून पूर्ण नेटवर्क सांभाळायचे. छांगूर बाबा आणि त्याचा मुलगा मेहबूब हे संपूर्ण धर्मांतर नेटवर्क एकत्र चालवत होते. छांगूर बाबा नसरीनला पत्नी म्हणून ठेवत होता आणि सतत लोकांचे धर्मांतर करण्यात गुंतलेला होता. पण, नुकताच यूपी एटीएसने छांगूर बाबा, त्याचा मुलगा मेहबूब, नीतू नवीन व्होरा आणि नवीन व्होरा यांना अटक केली.

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छांगूर बाबाने मुंबईतील व्होरा कुटुंबाला पूर्णपणे इस्लाममध्ये धर्मांतरित केलं. 2015 मध्ये संपूर्ण व्होरा कुटुंबाने दुबईत इस्लाम धर्माचा स्वीकार केला. इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यानंतर कुटुंबाच्या नावावर पुणे आणि बलरामपूरमध्ये अनेक मालमत्ता खरेदी करण्यात आल्या.

एटीएसच्या तपासात असं दिसून आलं की, नीतू उर्फ ​​नसरीनच्या नावाने 8 बँक खाती उघडण्यात आली होती. संशयास्पद स्त्रोतांकडून या खात्यांमध्ये 5 कोटींहून अधिक रुपये आले. तर, ​​जमालुद्दीनच्या खात्यात 34 कोटी रुपये परदेशातून हस्तांतरित करण्यात आले. हा सर्व व्यवहार धर्मांतरासाठी केल्याचा आरोप आहे. तसेच पुणे, उत्तरौला, लखनऊ आणि इतर ठिकाणी मालमत्ता खरेदी करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे. गेल्या मंगळवारी छांगूर बाबाच्या बलरामपूर कोठीवर बुलडोझर कारवाई करण्यात आली.