Viral News : त्याने बोकड मारला, त्याच बोकडाच्या डोळ्याने त्याला संपवलं, नेमकं काय घडलं?

बागर साईसह मदनपूर गावचे अन्य रहिवासी खोपा धाम येथे रविवारी पोहोचले. तिथे त्यांनी बोकडाचा बळी दिला.

Viral News : त्याने बोकड मारला, त्याच बोकडाच्या डोळ्याने त्याला संपवलं, नेमकं काय घडलं?
man kills goat goats eye kills man
| Updated on: Jul 05, 2023 | 4:43 PM

नवी दिल्ली : त्याने बोकडाचा बळी दिला. पण बोकडाच्या डोळ्यापासून तो स्वत:चे प्राण वाचवू शकला नाही. बागर साई हा छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचा निवासी. 50 वर्षाच्या बागर साईचा नवस पूर्ण झाला म्हणून त्याने मंदिरात बोकडाचा बळी दिला. बागर साईसह मदनपूर गावचे अन्य रहिवासी खोपा धाम येथे रविवारी पोहोचले. तिथे त्यांनी बोकडाचा बळी दिला.

बोकडाचा बळी दिल्यानंतर मटण शिजवण्यात आलं. ते मटण खाताना बागर साईच्या ताटात बोकडाचा डोळा आला. शिजवलेल्या मटणाचा तुकडा बागर साईच्या ताटात होता. तोच बोकडाचा डोळा गिळताना बागरच्या गळ्यात अडकला. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.

त्याने बोकडाचा बळी दिला

तुकडा घशात अडकल्यामुळे बागर साईला श्वास घेता येत नव्हता. त्याला लगेच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. त्याने बोकडाचा बळी दिला. पण त्याच बोकडाच्या डोळ्याने बागर साईचे प्राण घेतले.