देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर, थेट म्हटले, राहुल गांधी यांना..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. यासोबतच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल आवाहन योग्यच असल्याचे म्हटले. दिल्लीहून आसामच्या दिशेने फडणवीस रवाना होतील.

देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर, थेट म्हटले, राहुल गांधी यांना..
Devendra Fadnavis
| Updated on: May 11, 2026 | 1:14 PM

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दाैऱ्यावर आहेत. केंद्रातील काही महत्वाच्या नेत्यांसह उद्योगप्रश्नी चर्चा आहे. आज दिल्लीत भारतीय उद्योग महासंघाच्या बैठकीचेही आयोजन करण्यात आलंय. राज्याच्या आैद्योगिक विस्ताराच्या अनुषंगाने दिल्लीत बैठक आहे. दिल्लीहून देवेंद्र फडणवीस गुवाहटीकडे रवाना होतील. त्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, महाराष्ट्र राज्य स्टार्टएपमध्ये नंबर वन आहे. 2025-30 साठी मल्टी ईअर टॅरिफ मंजूर करण्यात आला. सध्या जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांवर मोठा ताण पडतो आहे. आपल्या बाजूला पाकिस्तानमध्ये पेट्रोलचे भाव 450 रूपये आहे. अनेक देशांमध्ये पेट्रोल डिझेलची मोठी कमतरता आहे. आपल्या देशामध्ये पंतप्रधानांमुळे आपल्याला पेट्रोल, डिझेल, गॅस सर्व मिळत आहे.

परकीय चलन कसे वाचवता येईल हे महत्वाचे..

पण मोदींनी सांगितले की, आपल्याला त्याचा अतिवापर करता येणार नाही. सप्लायवर ताण आहे. जास्तीत जास्त आपल्याला परकीय चलन कसे वाचवता येईल, हे आवाहन अत्यंत योग्य प्रकारचे आवाहन आहे. त्याला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, अशी आमची विनंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर राहुल गांधी यांनी टीका केली.

पंतप्रधानांचे आवाहन योग्य- देवेंद्र फडणवीस

यावर बोलताना फडणवीसांनी म्हटले की, मोदींनी सांगितलेल्याचा अर्थ जर राहुल गांधी यांना कळाला नाही तर त्यांना त्यात दोष देता येत नाही. कुठे तरी त्यांची समजच कमी आहे. जनतेला कळाले आहे, त्यामुळे जणता त्याला प्रतिसाद देईल. जनतेने सर्वात नाकारलेले नेते राहुल गांधी आहेत, असेही म्हणताना देवेंद्र फडणवीस दिसले.

देवेंद्र फडणवीसांची राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका 

पुढे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले की, राहुल गांधींना तुम्ही महत्व देता आम्ही नाही. इतर देशात पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांनी जनतेला केलेल आवाहन योग्यच असल्याचेही सांगताना देवेंद्र फडणवीस दिसले.

Follow Us