चीननं डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवली, चायनाचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जगाचं टेन्शन वाढलं

डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ वॉर सुरू केल्यानंतर अमेरिका आणि चीनच्या संबंधांमध्ये देखील मोठा तणाव निर्माण झाला आहे, त्यातच आता चीनने अमेरिकेला मोठा धक्का दिला असून, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी बातमी समोर आली आहे.

चीननं डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवली, चायनाचा अमेरिकेला सर्वात मोठा धक्का, जगाचं टेन्शन वाढलं
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 07, 2025 | 7:19 PM

चीनेने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं टेन्शन वाढवलं आहे. चीनने आता पाचव्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट J-20 चं अपग्रेडेड व्हर्जन J-20A तयार केलं आहे. याला चायनाचा सर्वात घातक “माईटी ड्रॅगन” असेही म्हटले जाते. या फायटर जेटमुळे चीनच्या वायू दलाच्या शक्तिमध्ये अनेक पटींनी वाढ झाली आहे. चीनचं हे स्टेल्थ फायटर जेट J-20A अमेरिकेच्या F-22 आणि F-35 फायटर जेटपेक्षा खूपच शक्तिशाली आणि वेगळं आहे. लांब पल्ल्याच्या मिशनला यशस्वी करण्यासाठी चीनकडून हे फायटर जेट तयार करण्यात आलं आहे.

चीनने आपल्या J-20A फायटर जेटमध्ये दोन Shenyang WS-15 आफ्टरबर्निंग टर्बोफॅन इंजिन बसवले आहेत. हे दोन्ही इंजिन प्रचंड शक्तिशाली आहेत.हे इंजिन अमेरिकेच्या F-22 आणि F-35 फायटर जेटला लावण्यात आलेल्या इंजिनपेक्षा प्रचंड क्षमता असलेले आणि पावरफूल आहेत. हे फायटर जेट असं बनवण्यात आलं आहे, जे इंधनाची तर बचत करतच मात्र लांब पल्ल्याच्या मिशनसाठी हे सर्वाधिक सक्षम मानलं जात आहे. तसेच हे रडारपासून वाचण्यात देखील सक्षम आहे. या फायटर जेटचं फ्रंट प्रोफाइल हे रडार क्रॉस -सेक्शनचं आहे. त्यामुळे रडारवर त्याला पकडनं अवघड आहे.

प्रचंड शस्त्र ठेवण्याची क्षमता

नॅशनल सिक्योरिटी जनरलच्या एका रिपोर्टनुसार J-20A मध्ये प्रचंड प्रमाणात शस्त्राचा साठा ठेवण्याची क्षमता आहे. विशेष म्हणजे या जेटमधून वेगवेगळ्या प्रकारच्या आणि खतरनाक मिसाईलचा मारा सहज केला जाऊ शकतो. लांब पल्ल्यांच्या माऱ्यासाठी ज्या मिसाईलचा उपयोग होतो, त्या PL-15 आणि PL-21 या दोन्ही मिसाईल यामध्ये सहज ठेवल्या जाऊ शकतात. तसेच या फायटर जेटच्या साईडला कमी रेंजच्या मिसाईल ठेवण्याची देखील सोय आहे. J-20A हे जवळपास 12,000 किलोग्राम इंधन क्षेमतेचं फायटर जेट आहे. याची एकावेळची उड्डाण क्षमता ही 2,000 किलोमीटरपर्यंत आहे, आणि या जेटमध्ये रिफ्यूलिंगची सुविधा असल्यामुळे हे विमान कितीही वेळ लढू शकतं. हा आता अमेरिकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. सोबतच चीनच्या या नव्या लढऊ विमानामुळे भारताचं देखील टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.