AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचा भारताला मोठा धक्का, खेळला डबल गेम, एकीकडे टॅरिफवरून अमेरिकेला सुनावलं तर दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसला

एकीकडे टॅरिफच्या मुद्द्यावरून चीनने भारताचं समर्थन करत अमेरिकेला सुनावलं, मात्र दुसरीकडे चीनने आता डबल गेम खेळल्याचं समोर आलं आहे. भारताला मोठा धक्का दिला आहे.

चीनचा भारताला मोठा धक्का, खेळला डबल गेम, एकीकडे टॅरिफवरून अमेरिकेला सुनावलं तर दुसरीकडे पाठीत खंजीर खुपसला
| Updated on: Aug 17, 2025 | 1:24 PM
Share

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे, सुरुवातीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावणार असं म्हटलं होतं, मात्र त्यानंतर भारत रशियाकडून तेल आयात करतो म्हणून भरतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता येत्या 28 ऑगस्टापासून भारतीय वस्तुंवर तब्बल 50 टक्के इतका टॅरिफ लावला जाणार आहे. यावरून चीनने आक्रमक भूमिका घेतली होती. टॅरिफच्या मुद्द्यावरून भारताला समर्थन देताना चीनने अमेरिकेला चांगलंच सुनावलं होतं. मात्र आता चीनने भारतासोबत डबल गेम खेळल्याचं समोर आलं आहे.

एकीकडे टॅरिफच्या मुद्द्यावरून चीनने भारताचं समर्थन करत अमेरिकेला सुनावलं, तर दुसरीकडे मात्र चीनने भारताच्या शत्रू राष्ट्राची मोठी मदत केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानला लढावू पाणबुड्या दिल्या आहेत. तर दुसरीकडे चीनने इस्रायलचा शत्रू असलेल्या इराणला देखील मिसाइल दिल्या आहेत, याबाबत इस्रायलचे वृत्तपत्र असलेल्या येदिओथ अहरोनोथच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे.

या रिपोर्टनुसार चीन आणि इराणमध्ये झपाट्यानं सैन्य मदत करार वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये इराणचं मोठं नुकसान झालं मात्र आता चीनच्या मदतीने पुन्हा एकदा इराण आपली मिसाईल शक्ती वाढवून आपल्यावर हल्ला करू शकतो अशी भीती इस्रायला वाटत आहे. चीनने अद्याप या गोष्टीचा स्वीकार केलेला नाही, मात्र वृत्त फेटाळून देखील लावलं नाही.

दरम्यान चीन सध्या इराणची मदत तर करतच आहे, मात्र दुसरीकडे भारतासाठी कायम डोकेदुखी ठरलेल्या पाकिस्तानसाठी देखील चीनने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. चीनकडून पाकिस्तानला शस्त्रांची आयात सुरू आहे. त्यातच आता अशी बातमी समोर आली आहे की, चीनने पाकिस्तानला आठ अद्यावत हेंगोर-क्लास पाणबुड्यांचा पुरवठा केला आहे, ज्यामुळे पाकिस्तानी नौवदलाच्या ताकद कैकपटीनं वाढली आहे. हा भारताला चीनकडून मोठा धक्का आहे. एकीकडे टॅरिफच्या मुद्द्यावरून चीनने अमेरिकेला सुनावलं, मात्र त्याचवेळी पाकिस्तानची देखील मदत केली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...