
पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला होता, या हल्ल्यामध्ये 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून या हल्ल्याचा बदला घेतला, भारतानं पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केला, या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्धवस्त झाले तर 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. दरम्यान त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र भारतानं हा हल्ला परतून लावला,भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोन आणि मिसाईल पाडले. तसेच भारतानं प्रत्युत्तर म्हणून केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. पाकिस्तानला तुर्की आणि चीनने मदत केल्याचं समोर आलं आहे. चीनने पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा पुरवठा केला, एवढंच नाही तर रडार आणि इंडेलिजेंसच्या माध्यमातून देखील चीनने पाकिस्तानची मदत केली.
मात्र भारतानं तुर्कस्थानावर बहिष्कार घालताच, आता चीनने देखील या कारवाईचा धसका घेतला आहे, चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिल्याचं सर्व जगाला माहीत आहे, मात्र तरी देखील आता चीनने युटर्न घेतला आहे, आम्ही पाकिस्तानला मदत केली नसल्याचं चीनने म्हटलं आहे. आम्हाला दोन्ही देश महत्त्वाचे असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचा दावा काय?
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश आमचे शेजारी आहेत, आम्हाला दोन्ही देश महत्त्वाचे आहेत. आम्ही दोन्ही देशांसोबत असलेल्या संबंधांना खूप महत्त्व देतो. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती, तेव्हा आम्ही निपक्षपाती भूमिका घेतली. आम्ही दोन्ही देशांना शांततेच आवाहन केलं, संयम ठेवा असं सांगितलं. आम्ही पाकिस्तानला मदत केली नाही असा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या युद्धविरामाचं देखील आम्ही स्वागत करतो असं चीनने म्हटलं आहे.
तुर्कीवर बहिष्कार
भारतानं तुर्कीवर बहिष्कार घातला आहे, भारतीय व्यापाऱ्यांनी तुर्कीच्या सफरचंदावर बहिष्कार घातला आहे, याचा मोठा फटका हा तुर्कस्थानला बसला आहे, तर दुसरीकडे भारतीय चित्रपट व्यावसायिकांनी देखील तुर्कीमधील चित्रिकरणावर बहिष्कार घातला आहे.