मोठी बातमी! चीनचा भारताला सर्वात मोठा धक्का, पुन्हा पाठीत खंजीर खुपसला, उडाली खळबळ

मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेनं भरतावर लावलेल्या टॅरिफनंतर भारतासोबत मैत्रीचं नाटक करणाऱ्या चीनने भारताला मोठा धक्का दिला आहे, पुन्हा एकदा भारताच्या पाठीत खंजीत खुपसला आहे.

मोठी बातमी! चीनचा भारताला सर्वात मोठा धक्का, पुन्हा पाठीत खंजीर खुपसला, उडाली खळबळ
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2025 | 7:05 PM

अमेरिकेकडून भारतावर सातत्यानं दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला, दरम्यान भारतावर लावण्यात आलेल्या टॅरिफनंतर अमेरिका आणि भारत यांच्यामधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. तर दुसरीकडे चीन आणि रशियासोबत भारताची जवळीकता वाढत आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून आपण टॅरिफ लावल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

तर दुसरीकडे अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफनंतर चीनने याचा निषेध करत अमेरिकेला चांगलंच सुनावलं होतं. तसेच भारतीय वस्तूंना आमची बाजारपेठ खुली आहे, आम्ही आमच्या बाजारपेठेत भारतीय वस्तुंचं स्वागत करू असं चीनने म्हटलं होतं. मात्र चीनने भारताच्या दिशेनं पुढे केलेला मैत्रीचा हात हा फसवाच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, चीनने पुन्हा एकदा भारताच्या पाठीत खंजीर खुपसला आहे.

एकीकडे चीन भारताच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र दुसरीकडे धोका देण्याचं काम सुरूच आहे. नुकतंच एक सॅटेलाईट छायाचित्र समोर आलं आहे, या छायाचित्रामधून दिसून येत आहे की, चीन पूर्व लडाखच्या पॅगोंग तलावाच्या पूर्व किनाऱ्यावर एक मिलिट्री कॉम्प्लेक्स बनवत आहे, जो आता लवकरच पूर्ण होणार आहे. पाच वर्षांपूर्वी भारत आणि चीनमध्ये जीथे सीमेवरून वाद झाला होता, त्या ठिकाणापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावरच हा मिलिट्री कॉम्प्लेक्स आहे. जर भविष्यात चीनी सैन्याला गरज लागली तर याचा मोठा फायदा त्यांना होणार आहे.

जे सॅटेलाईट छायाचित्र समोर आलं आहे, त्यावरून चीन पूर्व लडाखच्या पॅगोंग तलावाच्या पूर्व किनाऱ्यावर एक मिलिट्री कॉम्प्लेक्स बनवत असल्याचं दिसून येत आहे. चीनचं रडार देखील या सैन्य कॉम्पेक्सच्या जवळ असून, या कॉप्म्लेक्स मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी स्टोरेज करून ठेवण्याची देखील क्षमता आहे, या सैन्य कॉम्प्लेक्सकडे भविष्यातील भारतासाठी असलेला धोका म्हणून पाहिलं जातं आहे. एकीकडे चीन भारतासोबत मैत्रीचं नाटक करण्याचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे मात्र धोका सुरूच आहे.