आशियातील श्रीमंत व्यक्तीचा मुकेश अंबानींचा किताब चीनच्या उद्योगपतीने हिसकावला

| Updated on: Dec 31, 2020 | 3:12 PM

शानशान हे बाटलीबंद पाणी आणि कोरोनाची लस विकसित करण्याच्या उद्योगात असल्याचे सांगितले जाते. | Mukesh Ambani

आशियातील श्रीमंत व्यक्तीचा मुकेश अंबानींचा किताब चीनच्या उद्योगपतीने हिसकावला
Mukesh Ambani
Follow us on

नवी दिल्ली: रिलायन्स इंडस्ट्रीज उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असण्याचा मान आता गमावला आहे. चीनमध्ये वॉटर किंग प्रसिद्ध असणाऱ्या झोंग शानशान यांनी मुकेश अंबानी यांचा हा किताब हिसकावून घेतला आहे. पत्रकारिता, मशरुमची शेती आणि आरोग्य सेवा अशा विविध क्षेत्रांमध्ये मुशाफिरी करणारे झोंग शानशान (Zhong Shanshan) हे आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.

यंदाच्या वर्षात झोंग यांची संपत्ती 70.9 अब्ज डॉलर्सवरून वाढून 77.8 बिलियन डॉलर्स इतकी झाली आहे. शानशान हे बाटलीबंद पाणी आणि कोरोनाची लस विकसित करण्याच्या उद्योगात असल्याचे सांगितले जाते. झोंग शानशान यांच्या एकूण संपत्तीचे मूल्य पाहता जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांचा 11 वा क्रमांक लागतो. झोंग शानशान यांच्या संपत्तीच प्रचंड वेगाने वाढ झाली आहे. हा वेग कायम राहिला तर झोंग शानशान यांचे स्थान आणखी वर जाण्याची शक्यता आहे.

66 वर्षांचे झोंग शानशान मितभाषी म्हणून ओळखले जातात. त्यांना राजकारणात किंवा इतर उद्योगपतींबरोबर उठबस करण्यात फारसा रस नाही. ते प्रसारमाध्यमांसमोरही क्वचितच येतात. त्यामुळे चीनमधील उद्योगविश्वात त्यांना ‘लोन वुल्फ’ म्हटले जाते.

झोंग शानशान यांनी एप्रिल महिन्यात लस विकसित करणारी बीजिंग वंटाई बायोलॉजिकल फार्मसी एन्टरप्राईज ही कंपनी विकत घेतली होती. त्यानंतर महिनाभरात झोंग यांनी बाटलीबंद पाण्याची निर्मिती करणारी नोंगफू स्प्रिंग ही कंपनी विकत घेतली. या कंपनीच्या समभागांनी हाँगकाँगमधील शेअर बाजारात मोठी उसळी घेतली होती. नोंगफू कंपनीच्या समभागांची किंमत 155 टक्क्यांनी वाढली होती. तर वंटाईच्या कंपनीच्या समभागांचे मूल्य 2000 टक्क्यांनी वाढले होते.

संबंधित बातम्या:

Mukesh Ambani | मुकेश अंबानी जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत, एकूण संपत्ती किती?

कोरोनाचा मुकेश अंबानींना सर्वात मोठा फटका, दोन महिन्यात 1.3 लाख कोटींचं नुकसान

Yes Bank | ‘रिलायन्स’चे अध्यक्ष अनिल अंबानींना ‘ईडी’चे समन्स

मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, संपत्ती तब्बल…