AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yes Bank | ‘रिलायन्स समुहा’चे अध्यक्ष अनिल अंबानींना ‘ईडी’चे समन्स

अनिल अंबानींना मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास समन्स बजावण्यात आलं आहे Anil Ambani summoned by ED

Yes Bank | 'रिलायन्स समुहा'चे अध्यक्ष अनिल अंबानींना 'ईडी'चे समन्स
| Updated on: Mar 16, 2020 | 11:04 AM
Share

मुंबई : ‘येस बँके’चे संस्थापक राणा कपूर आणि इतरांविरुद्ध सुरु असलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी ‘रिलायन्स समूहा’चे अध्यक्ष अनिल अंबानी यांना पाचारण करण्यात आले आहे. अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अनिल अंबानी यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. (Anil Ambani summoned by ED)

‘येस बँके’ने दिलेल्या कर्जाच्या संदर्भात अनिल अंबानी यांची चौकशी होणार आहे. अंबानींना मुंबईतील अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांसमोर आज (सोमवार 16 मार्च) हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत अनिल अंबानींचा जबाब नोंदवण्यात येईल.

अनिल अंबानी यांना शनिवारी समन्स बजावण्यात आलं होतं, मात्र त्यांनी वैद्यकीय कारण देत हजेरीसाठी अधिकचा वेळ मागितला आहे. त्यांनी आज हजेरी न लावल्यास ईडी दुसरा समन्स जारी करेल. अन्यथा या आठवड्यात ‘रिलायन्स फायनान्शियल’च्या अधिकाऱ्यांना बोलावले जाईल.

रिलायन्स समूहाने 12 हजार 800 कोटी रुपयांचं कर्ज घेतल्याची माहिती आहे. कर्जाचा बोजा वाढल्यामुळे ‘येस बँक’ आर्थिक संकटात सापडली आहे. त्यामुळे खातेधारकांवरही पैसे काढण्यासाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.

दरम्यान, ‘येस बँके’चे राणा कपूर सध्या ‘ईडी’च्या कोठडीत आहेत. अनिल अंबानींचा समूह, एस्सेल ग्रुप, आयएलएफएस, डीएचएफएल, व्होडाफोन या कंपन्यांनी ‘येस बँके’कडून कर्ज घेतल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत दिली होती.

सरकारने शुक्रवारी अधिसूचित केलेल्या ‘येस बँक पुनर्गठन योजने’अंतर्गत एसबीआय तीन वर्षांसाठी येस बँकेतील हिस्सा 26 टक्क्यांपेक्षा कमी करु शकणार नाही. त्याचबरोबर इतर गुंतवणूकदार आणि विद्यमान भागधारकांना येस बँकेत 75 टक्के गुंतवणूक तीन वर्षांसाठी राखून ठेवावी लागेल. परंतु 100 पेक्षा कमी भागधारकांसाठी अशी कोणतीही अट किंवा लॉक-इन कालावधी नसेल. (Anil Ambani summoned by ED)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.