Mukesh Ambani | मुकेश अंबानी जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत, एकूण संपत्ती किती?

रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आता जगातील सर्वात श्रीमंत 10 लोकांच्या यादीतही जागा मिळवली आहे.

Mukesh Ambani | मुकेश अंबानी जगातील 10 सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत, एकूण संपत्ती किती?

मुंबई : गेल्या 8 वर्षांपासून देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या (Worlds 10 Richest Person) क्रमांकावर असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी आता जगातील सर्वात श्रीमंत 10 लोकांच्या यादीतही जागा मिळवली आहे. ब्लूमबर्ग बिलिअनेअर इंडेक्सनुसार, 64.5 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 5 हजार कोटी रुपयांच्या एकूण संपत्तीसह मुकेश अंबानी या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी हे एकमेव आशियायी उद्योगपती आहेत ज्यांनी या यादीत स्थान मिळवले (Worlds 10 Richest Person).

रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये 42 % भागीदारी असलेल्या मुकेश अंबानींना सर्वाधिक फायदा हा कंपनीच्या डिजीटल युनिट जियो (Jio) प्लॅटफॉर्म लिमिटेडमुळे झाला. कोरोनामुळे जगभरातील कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे. मात्र, मार्च महिन्यानंतर रिलायन्सच्या शेअर्सचा बाजारभाव दुप्पट झाला.

रिलायन्स कर्जमुक्त कंपनी झाली

रिलायन्स इंडस्ट्री पूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे, अशी माहिती मुकेश अंबानींनी शुक्रवारी (20 जून) दिली. गेल्या दोन महिन्यात राइट्स इश्यू आणि जागतिक गुंतवणूकदारांकडून 1.69 कोटी रुपये जमा केल्यावर कंपनीचे कर्ज शून्यावर आले आहे. रिलायन्सने निश्चित काळाच्या 9.5 महिन्यांपूर्वीच आपले कर्ज फेडले. फेसबुक, सिल्व्हर लेक पार्टनर, केकेआर यासारख्या 10 बड्या जागतिक कंपन्यांनी रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. एका अभ्यासानुसार, 2025 पर्यंत भारतीय दूरसंचार बाजारातील 48 टक्के भाग जियोने व्यापलेला असेल.

मुकेश अंबानींचं वडिलांच्या बिझनेसमध्ये पदार्पण

स्टॅनफोर्ड बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1980 मध्ये वडील धीरु भाई अंबानी यांच्या सांगण्यावरुन मुकेश अंबानींनी व्यवसायात पहिलं पाऊल टाकलं. 2002 धीरु भाई यांच्या निधनानंतर संपत्तीच्या वादातून भाऊ अनिल अंबानी आणि मुकेश अंबानी यांच्यात व्यवसायाचे विभाजन करण्यात आले.

त्यानंतर मुकेश अंबानी यांच्या वाट्याला रिफाइन, पेट्रोकेमिकल, तेल आणि वायू आणि वस्त्रोद्योग हे व्यवसाय आले. महसूलच्या हिशोबाने सध्या रिलायन्स इंडस्ट्री भारताची सर्वात मोठी कंपनी आहे (Worlds 10 Richest Person).

संबंधित बातम्या :

कोरोनाचा मुकेश अंबानींना सर्वात मोठा फटका, दोन महिन्यात 1.3 लाख कोटींचं नुकसान

Yes Bank | ‘रिलायन्स’चे अध्यक्ष अनिल अंबानींना ‘ईडी’चे समन्स

मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीय, संपत्ती तब्बल…

Published On - 6:38 pm, Sat, 20 June 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI