कोरोनाचा मुकेश अंबानींना सर्वात मोठा फटका, दोन महिन्यात 1.3 लाख कोटींचं नुकसान

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani net worth) यांची संपत्ती दोन महिन्यात 28 टक्क्यांनी  घसरली आहे.

कोरोनाचा मुकेश अंबानींना सर्वात मोठा फटका, दोन महिन्यात 1.3 लाख कोटींचं नुकसान
Follow us
| Updated on: Apr 06, 2020 | 10:46 PM

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani net worth) यांची संपत्ती दोन महिन्यात 28 टक्क्यांनी  घसरली आहे. त्यांची संपत्ती 31 मार्चपर्यंत 48 बिलियन डॉलर (3.7 लाख कोटी) इतकी होती. शेअर मार्केट सतत खाली घसरत असल्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून दररोज त्यांचे 3000 मिलियन डॉलरचं नुकसान होत आहे. गेल्या दोन महिन्यात त्यांतं जवळपास 1.3 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे (Mukesh Ambani net worth).

हुरुन ग्लोबल रिच लिस्टनुसार, जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत मुकेश अंबानी दोन महिन्यांपूर्वी आठव्या क्रमांकावर होते. मात्र, आता ते 17 व्या क्रमांकावर आले आहेत. भारतातील फक्त मुकेश अंबानीच नाही तर इतरही उद्योगपतींना कोरोनाचा मोठा फटका बसला आहे.

भारतीय उद्योगपती गौतम अडाणी यांची संपत्ती गेल्या दोन महिन्यात 37 टक्क्यांनी (6 बिलियन डॉलर) घसरली आहे. त्यापाठोपाठ एचसीएल टेक्नोलॉजीचे मालक शिव नादर यांची संपत्ती 26 टक्क्यांनी (5 बिलियन डॉलर) तर उदय कोटक यांची संपत्ती 28 टक्क्यांनी (4 बिलियन डॉलर) घसरली आहे.

मुकेश अंबानी यांच्यानंतर जगभरातील सर्वात श्रीमंत 100 उद्योगपतींच्या यादीत भारताचे उद्योगपती गौतम अडाणी, शिव नादर, उदय कोटक याचं नावं होती. मात्र, आता या तिघंही उद्योगपतींची नावं या यादीत नाही. भारताच्या फक्त मुकेश अंबानी यांचं नाव या यादीत आहे.

कोरोनामुळे भारतीय बाजारात गेल्या दोन महिन्यात 25 टक्क्यांनी घसरण झाली आहे. अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत 5.2 टक्क्यांनी घसरली आहे. दरम्यान, मुकेश अंबानी यांना हा फार मोठा झटका आहे, असं ‘हुरुन रिपोर्ट इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक अनस रहमान म्हणाले आहेत.

कोरोनामुळे इतकं मोठं नुकसान सहन करणाऱ्या उद्योगपतींच्या यादीत मुकेश अंबानी जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहेत. प्रथम क्रमांकावर फ्रान्सचे उद्योगपती बर्नार्ड अरलॉन्ट आहेत. त्यांचं गेल्या दोन महिन्यात 28 टक्के म्हणजेच 30 बिलियन डॉलर इतकं संपत्तीचं नुकसान झालं आहे. याशिवाय अमेरिकेचे उद्योगपती वॉरेन बफेट याचंही 19 बिलियन डॉलरचं नुकसान झालं आहे.

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत चीनच्या उद्योगपतींना फायदा झाल्याचं समोर आलं आहे. चीनचे सहा अब्जाधिशांची नावं जगभरातील 100 सर्वाधिक श्रीमंत उद्योगपतींच्या यादीत आलं आहे.

हेही वाचा :

उद्धव ठाकरेंकडे इटली-अमेरिकेपेक्षा अधिक दूरदृष्टी, ठाकरेंकडे पाहूनच मोदींचा ‘तो’ निर्णय : संजय काकडे

कोरोनामुळे महाविद्यालय, विद्यापीठ आणि सीईटीच्या परीक्षेबाबत सरकारचा मोठा निर्णय

Non Stop LIVE Update
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.