CJP Abhijeet Dipke : सीजेपीचं नवं मिशन, आणली कोड लँग्वेज, सरकारविरोधात…व्हिडीओ पोस्ट करून मोठं आवाहन!
आपले काही व्हिडीओ उडवून टाकू द्या. काही अकाऊंटही बंद होतील. परंतु ते आपल्याला इन्स्टाग्रमच नव्हे तर कुठूनच हटवू शकत नाहीत. लढत राहू. जिंकत रारू. थांबायचे नाही, असेही रांका यांनी सांगितलेय.

Ashutosh Ranka : सीजेपीने सध्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. या मागणीसाठी सीजेपीने नवे आंदोलन उभे केले आहे. काहीही झालं तरी आम्ही ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेणारच, असा निश्चय त्यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे हा लढा लढत असताना आमच्या सरकारविरोधातील सोशल मीडियावरील पोस्ट, व्हिडीओ डिलीट केले जात आहेत, असा दावा सीजेपीने केलाय. असे असतानाच आता सीजेपीने नावा प्लॅन समोर आणला आहे. सोशल मीडियावरील अल्गोरिदमला मुर्खात काढण्यासाठी आता यापुढे आपण सांकेतिक भाषेत बोलायचे, असे आवाहन सीजेपीने केले आहे.
सोशल मीडिया खाते बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय
सीजीपेचे संयोजक आशुतोष रांका यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. हाच व्हिडीओ सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीदेखील शेअर केलाय. याच व्हिडीओमध्ये ‘मेट्रो बंद केल्यानंतर, ट्रेन बंद केल्यानंतर, विमानातून बाहेर काढल्यानंतर आता आमचे सोशल मीडिया खाते बंद करण्याचा प्रयत्न केला जातोय,’ असा दावा रांका यांनी केलाय.
आता आपल्याला सांकेतिक भाषेत बोलायचे आहे
तसेच, ‘1945 सालच्या जर्मनीत, 1935 सालच्या भारतात, नॉर्थ कोरियात आहात, अशी तुम्ही कल्पना करा. अशा प्रकारच्या राजवटीशी तुम्ही लढत आहात, असे समजा. त्यामुळे आता आपल्याला कोड लँग्वेजमध्ये बोलावे लागेल. आपल्याला बीसीसीआय बाबत (अमित शाह), आपल्याला गुन्नू (ज्ञानेश कुमार) यांच्याबाब सांकेतिक भाषेत बोलायचे आहे. एखादा गंभीर विषय असेल तर व्यंगात्मक पद्धतीने बोलावे लागेल. अल्गोरिदमला आपल्याला मुर्खात काढावे लागेल,’ असे आवाहनही त्यांनी सर्वांना केलेय.
इंडिया आघाडीच्या मोर्चाला पाठिंबा
आपले काही व्हिडीओ उडवून टाकू द्या. काही अकाऊंटही बंद होतील. परंतु ते आपल्याला इन्स्टाग्रमच नव्हे तर कुठूनच हटवू शकत नाहीत. लढत राहू. जिंकत रारू. थांबायचे नाही, असेही रांका यांनी सांगितलेय. दरम्यान, आता रांका यांच्या या आवाहनानंतर तरुणाई कसा प्रतिसाद देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सध्यातरी सीजेपीने इंडिया आघाडीच्या 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या महामोर्चाला पाठिंबा जाहीर केलाय. या मोर्चात सीजेपी सक्रीयपणे सहभागी होणार आहे.